जिल्ह्यातील ‘द्राक्ष पंढरी’वर संकटाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:12 AM2019-10-21T01:12:39+5:302019-10-21T01:14:03+5:30

द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरणामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात ठराविक अंतराने कोसळणाºया पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे.

Clouds of distress over the 'grape ponds' in the district | जिल्ह्यातील ‘द्राक्ष पंढरी’वर संकटाचे ढग

जिल्ह्यातील ‘द्राक्ष पंढरी’वर संकटाचे ढग

Next
ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : फुलोऱ्यातील बागांचे पाऊस, थंडीने नुकसान

नाशिक : द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरणामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात ठराविक अंतराने कोसळणाºया पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याची शक्यता असून, फुलोºयातील द्राक्षबागांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार असल्याने द्राक्षबागायतदारांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा मोठा फटका बसला आहे.
संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे गेल्या महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले असताना त्यातून सावरलेला शेतकरी अचानक झालेल्या वातावरणामुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी छाटणी झालेल्या द्राक्षबागा सध्या फुलोºयात असून, अशा बागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला.

Web Title: Clouds of distress over the 'grape ponds' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.