वातावरण बदलाचा उडीद, मूग पिकांवर प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:08 PM2020-09-14T23:08:31+5:302020-09-15T01:28:51+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलून चालू वर्षी उडीद व मूग या डाळ वर्णीय नगदी पिकांना पंसती दिली होती. सुरु वातीस पीक अतिशय जोरात बहरात आले. परंतु अचानक हवामानात बदल परिणाम झाल्यामुळे उडीद ,मूगाच्या पिकांवर रोगाचे आक्रमन होत असल्याने उत्पन्नात मोठया प्रमाणावर घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Climate change impacts greenhouse crops | वातावरण बदलाचा उडीद, मूग पिकांवर प्रभाव

वातावरण बदलाचा उडीद, मूग पिकांवर प्रभाव

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी चिंतित : उत्पन्नात घट होण्याची शक्यता

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलून चालू वर्षी उडीद व मूग या डाळ वर्णीय नगदी पिकांना पंसती दिली होती. सुरु वातीस पीक अतिशय जोरात बहरात आले. परंतु अचानक हवामानात बदल परिणाम झाल्यामुळे उडीद ,मूगाच्या पिकांवर रोगाचे आक्रमन होत असल्याने उत्पन्नात मोठया प्रमाणावर घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सुरु वातीस तालुक्यात ऊन व पाऊस यामुळे उडीद व मूग पिकाला पोषक वातावरण तयार झाले होते. भीज स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे या पिकांवर विविध प्रकारचे रोग, तुडतुडे, अळी, कीड नसल्यामुळे उडीद ,मूगाचे पिक चांगले येईल म्हणून शेतकरी वर्ग खुशीत होता. मात्र, थोड्याच दिवसात या पिकाला दृष्ट लागावी तसा प्रकार होऊन उडीद व मूगाचे झाड पिवळे पडू लागल्यामुळे अनेक शेतक-यानी फवारणी सुद्धा केली. पंरतु त्याचा फारसा फरक पडला नाही. या पिकांचे झाड पुन्हा हिरवे झाले नाही, त्याचा परिणाम या झाडाना शेंगा अतिशय कमी प्रमाणात आल्या. तर काही झांडाना शेंगा आल्याच नाहीत.
दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये उडीद व मूगाचे पिक बर्यापैकी घेतले जाते. बाकी ठिकाणी शेतकरी फक्त घरासाठी या पिकांची पेरणी करतात काही शेतकरी भुईमूगाच्या शेतामध्येच उडीद व मूग या पिकाची पेरणी करतात. मात्र चालू वर्षी सर्व ठिकाणी हे पिक पिवळे पडल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक शेतक-यांना या वेळीस कुटुंबासाठी बाजारातून उडीद ,मूगाची खरेदी करावी लागते की काय आशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
चौकट
1) हवामानातील बदलाने शेतकर्यांच्या आशा मावळल्या आहेत.
2) भांडवल खर्च करूनहीजास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही.
3) खरीप हंगामातील पिकांनी केली निराशा.
4) नुकसान भरपाई देण्याची शेतकर्यांकडून मागणी.
कोट
दिंडोरी तालुक्यात उडीद व मूगाच्या पिकांने शेतक-यांची मोठ्या प्रमाणात निराशा केली असून हे पिक बहरात पिवळे पडण्यांचा प्रकार पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे यंदा शेतकरी वर्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
- अजित कड, शेतकरी, दहेगाव
(फोटो :14लखमापूर1,2,3)

 

Web Title: Climate change impacts greenhouse crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.