ग्रामीण भागात गावांची धुलाइ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:52 PM2020-04-01T22:52:43+5:302020-04-01T22:53:06+5:30

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही ग्रामपंचायतीमार्फत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अनेक ...

Cleaning of villages in rural areas | ग्रामीण भागात गावांची धुलाइ

ग्रामीण भागात गावांची धुलाइ

Next
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : निर्जंतुक करण्याचा प्रयर्त्न

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही ग्रामपंचायतीमार्फत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फवारणी करून प्रत्येक गावाची धुलाई केली जात आहे.
अनेक वर्षे पाण्याने साफसफाई न झालेली ही सार्वजनिक ठिकाणे या निमित्ताने स्वच्छ होत आहे. त्यासाठी शेतीत फवारणी करणाऱ्या ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. पाण्यात सोडियम क्लोराईड टाकून गावात फवारणी केली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासन स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याच पाशर््वभूमीवर नाशिक महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम राबवितयानंतर आता तीच पद्धत खेड्यातही वापरली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे मालेगाव महापालिका क्षेत्रातही फवारणी नियमितपणे केली जात आहे. सिन्नर, येवला, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सटाणा, देवळा, नांदगाव, चांदवड, कळवण या तालुकयांसह पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील खेडे, पाडे आणि वाडी वस्त्यांमध्ये नियमति साफसफाई केली जात आहे. सिन्नर तालुक्यातील वावी, निरहाळे, नायगाव खोरे, पांगरी, नांदूरशिंगोटे, दिंडोरी तालुक्यातील उमराळे, मातेरेवाडी, मोहाडी, वणी, मडकीजाम्ब, जामबुटके, ननाशी, चाचडगाव, लकमापूर, वणी यांसह निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील सायखेडा, भेंडाळी, म्हाळसाकोरे, मांजरगाव, करंजगाव, भुसे, चाटोरी, चांदोरी, पिंपळस, शिंगवे या गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांची औषध फवारणी करणाºया ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावातील गल्ली, सार्वजनिक ठिकाण, अशा ठिकाणी या औषधाची फवारणी करून गाव निर्जंतुक करण्यात येत आहे. चौकाचौकांमध्ये जनजागृती केली जात आहे. ग्रामीण भागात नागरिकांनी लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया सर्वच गावांमध्ये दिवसभरात अनेकदा पोलिसांची गस्त असल्याने नागरिक रस्त्यावर दिसत नाही. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद असून, नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद आहे. अनेक गावातील आठवडे बाजार बंद आहे. काही ठिकाणी मात्र योग्य खबरदारी घेऊन भाजीपाला विक्री होत आहे. आरोग्य विभाग ग्रामपंचायत, महसूल कर्मचारी ,शिक्षक असे सर्वच कर्मचारी आपापली भूमिका योग्य प्रकारे निभावत आहे.

Web Title: Cleaning of villages in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.