ऋतू-कालचक्रानुसार ऐकायला मिळणार शास्त्रीय संगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:42+5:302021-02-06T04:23:42+5:30

नाशिक : संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून नाशिकचे संगणकतज्ज्ञ ...

Classical music can be heard according to the seasons | ऋतू-कालचक्रानुसार ऐकायला मिळणार शास्त्रीय संगीत

ऋतू-कालचक्रानुसार ऐकायला मिळणार शास्त्रीय संगीत

Next

नाशिक : संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून नाशिकचे संगणकतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी समयसंगीत डॉट ॲपचे प्रसारण करीत पंडितजींना अनोखी संगीतमय आदरांजली अर्पण केली आहे. नवकल्पनेव्दारे त्यांनी समय अन‌् ऋतूचक्रावर आधारीत डिजिटल संगीत वेबसाईटचे ऑनलाईन प्रसारण केले असून ही सुविधा कोणत्याही नोंदणीशिवाय व विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आबालवृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी समाज घडवण्याचा पंडितजींचा वसा संगणकयुगातही अव्याहत सुरू रहावा, यासाठी पंडितजींच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त खांडबहाले.कॉम या भारतीय राजभाषा डिजिटल शब्दकोशाचे निर्माते संगणकतज्ज्ञ खांडबहाले यांनी ही संकल्पना साकारली आहे.कुठल्याही डाऊनलोडशिवाय आपल्या मोबाईल अथवा संगणकाच्या एका क्लिकवर संगीतक्षेत्रातील पूर्वासुरींसोबतच नवोन्मुख कलाकारांच्या सुमधुर संगीत श्रवणाच्या मेजवानीचा आस्वाद दिवसातील २४ तास व वर्षातील १२ ही महिने संगीतप्रेमींना अखंड घेता येणार आहे. भारतीय संगीत शास्त्राचा प्रचार-प्रसार व्हावा व तरुण पिढीमध्ये सात्विक संगीत श्रवणाची ओढ लागावी, या उदात्त हेतूने त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

इन्फो

आठ प्रहर अन सहा ऋतूंचा आधार

योग्य वेळी योग्य संगीत ऐकल्यास वृक्षवल्ली-पशुपक्ष्यांसहित सृष्टीतील अखंड प्राणिमात्रांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात या वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित या वेबसाईटमध्ये दिवसाचे पूर्वान्ह, मध्यान्ह, अपरान्ह, सायंकाल, प्रदोष, निशिथ, त्रियाम, उषा असे आठ प्रहर आणि वर्षभरातील वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतू या कालचक्रानुसार मौखिक आणि वाद्य संगीत श्राव्य स्वरूपातील स्वयंचलित-तंत्रज्ञान-कार्यप्रणाली प्रसारण संरचना विकसित केलेली आहे.

Web Title: Classical music can be heard according to the seasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.