लोकवस्तीजवळच बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:48 AM2019-11-21T00:48:08+5:302019-11-21T00:48:24+5:30

भगूर कॉर्नर परिसरातील बार्न्स स्कूलच्या परिसरात बिबट्याने लोकवस्तीत शिरकाव केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. येथील एका बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर बिबट्याने रात्रीच्या वेळी रुबाबदार बैठक मारल्याचे छायाचित्र सोशल मीडियातून व्हायरल झाले

 Citizens were scared to death when a crib broke out near the population | लोकवस्तीजवळच बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिक भयभीत

लोकवस्तीजवळच बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिक भयभीत

Next

देवळाली कॅम्प : भगूर कॉर्नर परिसरातील बार्न्स स्कूलच्या परिसरात बिबट्याने लोकवस्तीत शिरकाव केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. येथील एका बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर बिबट्याने रात्रीच्या वेळी रुबाबदार बैठक मारल्याचे छायाचित्र सोशल मीडियातून व्हायरल झाले असून, येथील रहिवाशांपैकी काही युवक सायंकाळी ७ वाजेपासून जागते रहो म्हणत ‘पहारेकरी’ची भूमिका बजावताना दिसून येत आहे.
शिवानंदा फार्म हाउसच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भिंतीवर रात्रीच्या सुमारास बिबट्या बसलेला काही नागरिकांना दिसून आला. मल्हारबाबानगर, बार्न्स स्कूल परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने वन्यजीव मुख्य वनसंरक्षकाकडे याबाबत पाठपुरावा करून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. दोन महिन्यांपासून येथील वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने दर्शन देत काही ठिकाणी पाळीव प्राण्यांचा फडशा पाडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. अनेक ठिकाणी उसाचे मळे परिसर असल्याने बिबट्यांना पोषक वातावरण आहे.
देवळाली या परिसरात लष्कराची मोठी हद्द असून सुमारे २० हजार हेक्टरवर जंगल पसरलेले आहे. या जंगलात बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांचा वावर असून अनेकदा बिबटे भक्ष्याच्या शोधात जवळच्या मानवी वस्तीत शिरकाव करत असतात. येथील रस्त्याने प्रवास करत असलेल्या चारचाकी वाहनधारकाने बिबट्याचे बसलेल्या स्थितीतील फोटो काढले आहेत.
देवळाली कॅम्पला एकाच दिवशी नानेगाव रोड, बार्न स्कूलसह वडनेररोडवरील सोसायटी या तीन ठिकाणी बिबट्या दिसला आहे. मात्र एक बिबट्या साधारणत: सुमारे २० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात दुसऱ्या बिबट्याला शिरकाव करू देत नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाला सहकार्य करावे. या भागात सातत्याने वनरक्षकांची गस्त असून पिंजराही लवकरच लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. ज्या नागरिकांच्या पशुधनाची बिबट्याने हानी केली आहे, त्यांना शासन नियमानुसार नुकसानभरपाई निश्चित दिली जाईल. संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ वनक्षेत्रपाल पश्चिम कार्यालयाकडे अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title:  Citizens were scared to death when a crib broke out near the population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.