मतमोजणीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:25 AM2019-10-24T01:25:15+5:302019-10-24T01:25:55+5:30

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट लावून मतदान झालेली पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने सामान्य नागरिकांनादेखील यंदाच्या निकालाबरोबरच मतमोजणी कशाप्रकारे होते, त्याबाबत प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल आहे.

 Citizens keen on counting! | मतमोजणीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता!

मतमोजणीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता!

Next

नाशिक : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट लावून मतदान झालेली पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने सामान्य नागरिकांनादेखील यंदाच्या निकालाबरोबरच मतमोजणी कशाप्रकारे होते, त्याबाबत प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल आहे. प्रारंभी होणाऱ्या पोस्टल मतमोजणीपासून विजेत्या उमेदवाराला प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती नागरिकांचे कुतूहल शमविण्यास उपयुक्त ठरू शकणार आहे.
विधानसभेच्या मतमोजणी प्रक्रि येमध्ये सकाळी ६ पासूनच सर्व निवडणूक अधिकारी, सहकारी, कर्मचारी, तसेच उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रांवर दाखल होतात. सर्वप्रथम रिटर्निंग अधिकारी आणि त्यांचे सहकारी सगळ्यांसमोर मतांची गोपनीयता राखण्याची शपथ घेतात. त्यानंतर रिटर्निंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सगळ्या ईव्हीएमची तपासणी केली जाते. यावेळी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आपल्या काउंटिंग एजंटसोबत मतमोजणी केंद्रांवर उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. हे एजंट मतमोजणी पाहू शकतात. मतमोजणीला प्रारंभ केल्यानंतर सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी केली जाते. त्यानंतरच ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होते. मतदान केंद्रांवर एका विशिष्ट क्र माने ठेवलेल्या ईव्हीएम आॅन करून त्यांच्यात नोंदल्या गेल्या मतांची मोजणी होते. त्यानंतर वेगवेगळ्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची मोजदाद होते. त्यानंतर सगळ्या मतदान केंद्रांवरच्या ईव्हीएमवरील आकड्यांची बेरीज केली जाते. त्यातून उमेदवारनिहाय मतांची बेरीज समजून एकूण मतसंख्या समजते.
व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी
निवडणूक आयोगानुसारची मतमोजणी संपल्यानंतर त्यांची टोटल व्हीव्हीपॅटच्या पावत्यांशी पडताळून पाहिली जाते. या कामासाठी प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये वेगळा व्हीव्हीपॅट बूथ राहणार आहे. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा तांत्रिक अडचणींमुळे मतमोजणी थांबली तर याबद्दल ताबडतोब निवडणूक आयोगाला कळवणे, ही रिटर्निंग अधिकाºयाची जबाबदारी आहे. ही सूचना मिळताच निवडणूक आयोग त्या ठिकाणी मतमोजणी चालू ठेवणे, मतमोजणी रद्द करणे किंवा पुनर्मतदान करण्याचा आदेश देऊ शकते.
विजेत्या उमेदवाराला प्रमाणपत्र
जर कोणत्याही त्रुटीशिवाय मतमोजणी पूर्ण झाली आणि निवडणूक आयोगाने दुसरा कोणता आदेश दिला नाही तर रिटर्निंग अधिकारी निकाल घोषित करतात. तसेच त्यानंतर संबंधित विजेत्या उमेदवाराला त्याबाबतचे प्रमाणपत्रदेखील काही वेळात निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या हस्ते प्रदान केले जाते. निवडणूक आयोगाने यंदा सुविधा नावाचे अ‍ॅपही लाँच केले आहे. त्या अ‍ॅपवर मतदान केंद्रांचे अधिकृत निकाल नागरिकांना पाहता येऊ शकतात.

Web Title:  Citizens keen on counting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.