आदिवासी वस्तीतील बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:45 PM2019-11-12T17:45:44+5:302019-11-12T17:45:50+5:30

नांदगाव : एकाच कुटुंबातील तिघान्ाां जुलाब व उलट्यांचा त्रास

 Child death in tribal settlement | आदिवासी वस्तीतील बालिकेचा मृत्यू

आदिवासी वस्तीतील बालिकेचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे वस्तीतील आणखी दोघांना जुलाबाचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे, मात्र ही कोणत्याही प्रकारची साथ नसल्याचा खुलासा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी केला आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क

नांदगाव : शासनाची आधुनिक वैद्यकीय सेवा अवघ्या काही किलोमीटर अंतरावर उपलब्ध असतानासुद्धा अज्ञानामुळे घरगुती उपचारामागे लागून त्यात बराच कालावधी गेल्याने आदिवासी वस्तीतील एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना नस्तनपूरमध्ये घडली. दरम्यान, या वस्तीवरील जुलाब व उलट्या होत असलेल्या दोघा जणांना येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान वस्तीतील आणखी दोघांना जुलाबाचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे, मात्र ही कोणत्याही प्रकारची साथ नसल्याचा खुलासा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी केला आहे.
लसीकरणासाठी सदर वस्तीवर गेलेल्या पिंपरखेड प्राथमिक उपचार केंद्राच्या पथकाला सोनवणे यांच्या कुटुंबातील तिघांना जुलाब व उलट्यांचा त्रास होत असल्याचे दिसले. त्यापैकी रु पाली विष्णू सोनवणे (चार महिने) हिच्या तोंडातून रक्त व फेस येत असल्याने पथकातील मंडळींनी तिला ग्रामीण रु ग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, मात्र तिथे नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. शरीरातील रक्त खूपच कमी (हिमोग्लोबिन ३) व दुचाकीच्या सायलेन्सरचा चटका बसलेल्या उजव्या पायाच्या जखमेतून सेप्टीसेमिया होऊन तो संपूर्ण शरीरात पसरल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. बोरसे यांनी दिली.
दरम्यान, रु पालीवर महिन्यापासून घरगुती उपचार सुरू होते. डॉक्टरकडे न नेता केवळ गावठी घरगुती उपचार करण्यात कालापव्यय झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. वैद्यकीय पथकामुळे ही बाब उघडकीस आली. मयत रुपालीची बहीण लक्ष्मी (६) व भाऊ लवा सोनवणे (१६) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title:  Child death in tribal settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.