छगन भुजबळ यांनी स्वहस्ते केले शिवभोजन थाळीचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 04:22 PM2020-01-26T16:22:30+5:302020-01-26T16:22:43+5:30

नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवभोजन केंद्राचे उदघाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते तर मालेगाव बाजार समितीत कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

Chhagan Bhujbal was inaugurated by Shiv Bhoj Kendra in Nashik | छगन भुजबळ यांनी स्वहस्ते केले शिवभोजन थाळीचे वाटप

छगन भुजबळ यांनी स्वहस्ते केले शिवभोजन थाळीचे वाटप

Next

नाशिक-  राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्रेरणा महिला बचतगट संचलित बळीराजा रेस्टॉरंट येथे शिवभोजन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या या महत्वाकांक्षी योजनेत सहभागी होताना भुजबळ यांनी स्वहस्ते भोजनाच्या थाळी तयार करून त्या लाभार्थी नागरिकांना दिल्या.

नाशिक मध्ये चार शिवभोजन केंद्रे सुरू होणार असून त्यात आज दोन केंद्राचे उदघाटन होत असल्याचे सांगून त्यांनी या थाळी मुळे गरिबांची भूक भागेल परंतु बचत गटांना रोजगार मिळणार आहे असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हाधिकारी  सुरज मांढरे, उपायुक्त पुरवठा अर्जुन चिखले आदी उपस्थित होते.

 शिवभोजन योजना ही राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात पोटभर जेवण देणारी सरकारची अत्यंत महत्वकांक्षी  योजना आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभर पन्नासहुन अधिक ठिकाणी शिवभोजन प्रकल्प सुरू होत आहे. नाशिक जिल्हयामध्ये चार ठिकाणी  याचे  प्राथमिक स्वरूपात उदघाटन होत असून यातून दररोज सातशे  नागरिकांना जेवण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवभोजन केंद्रावर स्वच्छ स्वरुपात आणि चांगल्या दर्जेचे जेवण सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार शिवभोजन केंद्रांची व त्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाची  नियमित तपासणी  करण्यात येणार आहे, असेही भुजबळ म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज  मांढरे आणि प्रेरणा महिला बचतगट अध्यक्ष कविता कर्डक यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: Chhagan Bhujbal was inaugurated by Shiv Bhoj Kendra in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.