"काही लोकांना द्राक्ष आंबट पण नाशिकची द्राक्ष आंबट नाहीत"; छगन भुजबळांचा फडणवीसांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 07:51 PM2021-12-05T19:51:52+5:302021-12-05T20:06:38+5:30

Chhagan Bhujbal Slams Devendra Fadnavis : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी शहराबाहेर असलेल्या या जागी संमेलन घेण्याचा निर्णय घेणाऱ्या महामंडळाचे आभार मानले आहेत.

Chhagan Bhujbal Slams Devendra Fadnavis in Marathi Sahitya Sammelan nashik | "काही लोकांना द्राक्ष आंबट पण नाशिकची द्राक्ष आंबट नाहीत"; छगन भुजबळांचा फडणवीसांना टोला 

"काही लोकांना द्राक्ष आंबट पण नाशिकची द्राक्ष आंबट नाहीत"; छगन भुजबळांचा फडणवीसांना टोला 

Next

नाशिक - यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काही ना काही कारणाने गाजले. आज लोकसत्ताचे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक झाली, तरीही ते व्यासपीठावर उपस्थित राहिले. या साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शहराबाहेर असलेल्या या जागी संमेलन घेण्याचा निर्णय घेणाऱ्या महामंडळाचे आभार मानले आहेत. तसेच ग्रंथदिंडीला आलेल्या महापौरांचे देखील आभार मानले. संमेलन कसं होणार? काय होणार? अशा अनेक विषयांची मीडियात चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं. भाषा, लेखक, लोकशाही, शेतकरी, आंदोलनं, माध्यमातील मनोरंजन, बालसाहित्य यासह अनेक विषयांवर परिसंवाद झाले. 

निमंत्रित कवी 52, गझलकार 189, कवी 115 तर कविकट्ट्यावर 587 अनिमंत्रीत कवींनी सहभाग घेतला. कुसुमाग्रज नगरी नाव देण्याचं ठरलं होतं. या नावाला का विरोध व्हावा?स्वातंत्र्यवीर सावरकर हे आम्हा सगळ्यांचे, स्वातंत्र्यसूर्य असा उल्लेख का नाही आवडला? तरीही आदर्शाचा अपमान असा आरोप चुकीचा. कविकट्ट्याला नाव दिलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच "काही लोकांना द्राक्ष आंबट, पण नाशिकची द्राक्ष आंबट नाहीत" असं म्हणत भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. तसेच पाकिस्तानातही साहित्य संमेलन लोकांनी पाहिलं. आता समारोप होतोय, माझा जीव भांड्यात पडला असं देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे. 

"हे मराठीच्या बाबतीत सरकार का करत नाही?"

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी नाशिक म्हटलं की मला कवी गोविंद, सावरकर आणि अलीकडचे कुसुमाग्रज आठवतात मराठीकडे आपलं लक्ष आहे म्हणजे काय? असा सवाल बाळासाहेब थोरात यांना विचारला आहे. "शिक्षण, राज्य कारभार मातृभाषेत झाला तरच मराठीकडे लक्ष. सरकार म्हणतं की 10 वी पर्यंत मराठी शिकण्याची सक्ती. ही घोषणा लवकर अमलात आली तर बरं. हैदराबाद निजामाने ठरवलं की उर्दू राजभाषा तर शिक्षणही उर्दूत सक्ती केली. हे मराठीच्या बाबतीत सरकार का करत नाही? दक्षिणेत बँक व्यवहार फॉर्म तेलगुत, महाराष्ट्रात मात्र मराठीतही नाही. बेळगावात पाट्या कन्नडमध्ये ही कन्नड भाषा शिकण्याची सक्ती, सीमाभागातील मराठी बांधवांना ही सक्ती" असं नरेंद्र चपळगावकर यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Chhagan Bhujbal Slams Devendra Fadnavis in Marathi Sahitya Sammelan nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.