नाशिकच्या मेट्रो निओ प्रकल्पाला केंद्र सरकारची लवकरच मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 07:21 PM2021-03-25T19:21:29+5:302021-03-25T19:24:35+5:30

नाशिक-  देशातील पहिला किफायतशीर टायरबेस्ड प्रकल्प म्हणजेच नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पासाठीं केंद्र शासनाने अर्थसंकल्पात दोन हजार काेटी रूपयांंची मान्यता दिल्यानंतर आता केंद्रशासनाच्या अर्थ खात्याअंर्तगत असलेल्या पब्लीक इन्व्हेन्समेंट बोर्डाने (पीआयबी) देखील अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्र शासनाच्या अंतिम मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Central government's approval for Nashik's Metro Neo project soon | नाशिकच्या मेट्रो निओ प्रकल्पाला केंद्र सरकारची लवकरच मान्यता

नाशिकच्या मेट्रो निओ प्रकल्पाला केंद्र सरकारची लवकरच मान्यता

googlenewsNext
ठळक मुद्देपीआयबीकडून शिक्कामोर्तबचार वर्षात पूर्ण हेाणार प्रकल्प

नाशिक-  देशातील पहिला किफायतशीर टायरबेस्ड प्रकल्प म्हणजेच नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पासाठीं केंद्र शासनाने अर्थसंकल्पात दोन हजार काेटी रूपयांंची मान्यता दिल्यानंतर आता केंद्रशासनाच्या अर्थ खात्याअंर्तगत असलेल्या पब्लीक इन्व्हेन्समेंट बोर्डाने (पीआयबी) देखील अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्र शासनाच्या अंतिम मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक शहरासाठी असलेला हा एकमेवव्दितीय आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे. पीआयबीच्या मान्यतेनंतर केंद्र शासनाच्या आवास  आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी तसेच महामेट्रोचे महासंचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केंद्र शासनाची अंतिम मान्यता लवकरच प्राप्त होणार असून
त्यांनी महामेट्रोच्या अधिकारी वर्गाला कामाची रुपरेषा तयार करून काम सुरु करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधीत विभागांना देण्यात आल्या आहेत, असे सांगितले. तर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी या प्रसंगी हा प्रकल्प नाशिक शहराचे भविष्य बदलविणारा असून त्यामुळे प्रकल्पासाठी सहकार्य केले जाईल असे अश्वासन दिले आहे.

केंद्र शासनाने निओ मेट्रो प्रकल्पास मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारला देखील त्यात गुंतवणूक करावी लागणार आहे. केंद्रात भाजपा तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाविषयी शंका व्यक्त केली जात होती. मात्र,राज्य सरकारने देखील आवश्यक ती आर्थिक तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाचा संयुक्त प्रकल्प असलेल्या महामेट्रोच्या या प्रकल्पासाठी २०१८ पासून नाशिक शहरात चाचपणी करण्यात आली तसेच २ हजार ९२ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासन, राज्य शासन, सिडको आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरासाठी ३३ किमीचा मेट्रो निओ मार्ग बनवण्यात येणार आहे. गंगापूर ते मुंबई नाका आणि गंगापूर ते नाशिक रेल्वे स्थानक अशा ३३ किमीच्या दोन मार्गिकांमध्ये एकूण ३० स्थानके असणार आहेत. हा प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण होईल. नाशिक मेट्रो निओ प्रकल्प हा नाविन्यपूर्ण अश्या रबर टायर बस वापरून जलद प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. या रबर टायर बस ओव्हरहेड इलेक्ट्रिक द्वारा चालवण्यात येतील. संपूर्ण ३३ किमीची मार्गिका उन्नत असेल, त्यामुळे शहरातून या बस विनासायास व जलद गतीने प्रवास करू शकतील. नाशिक शहराच्या प्रवासी संख्यालक्ष्यात घेऊन या प्रकारचा नाविन्यपूर्ण मेट्रो निओ प्रकल्प योजण्यात आला आहे.

 

Web Title: Central government's approval for Nashik's Metro Neo project soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.