लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करतच बकरी ईद साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 08:38 PM2020-07-04T20:38:48+5:302020-07-04T23:21:34+5:30

मालेगाव : येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारात कुलजमात तंजलीमच्या मौलानांचीअपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

Celebrate Goat Eid by following the rules of lockdown | लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करतच बकरी ईद साजरी करा

लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करतच बकरी ईद साजरी करा

Next
ठळक मुद्देमालेगाव : कुल जमात तंजीमच्या मौलानांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारात कुलजमात तंजलीमच्या मौलानांचीअपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
शहर व परिसरात लॉकडाऊनची अमलबजावणी करण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. लॉकडाऊन व या आदेशाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करावे. पावसाळ्यात साथ आजार वाढू शकतात. आगामी बकरी ईदही लॉकडाऊनचे पालन करुन साजरी करावी असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुरूवारी केले.
मौलानांनी शहरवासियांना मास्क वापरण्यास, सामाजिक अंतर पाळण्यास सांगावे असे त्यांनी सांगितले. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथ आजार वाढू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन सहकार्य करावे, कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे असे ते म्हणाले.
अपर पोलीस अधीक्षक घुगे यांनी शहरातील रिक्षाचालक-मालकांचीही बैठक घेतली. पोलीस प्रशासनातर्फे रिक्षाचालकांना सॅनिटाइझर व सोडियम हायपोक्लोराईड वाटप करण्यात आले. बैठकीस आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस आदींसह कुल जमाती तंजिमचे मौलाना उपस्थित होते.

Web Title: Celebrate Goat Eid by following the rules of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.