बिटको रुग्णालयात धुडगुस घालणाऱ्या कन्नू ताजणेविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 PM2021-05-16T16:23:42+5:302021-05-16T16:27:58+5:30

नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात शनिवारी (दि.१६) चारचाकी कार घुसवून धडगूस घालत तोडफोड केल्या प्रकरणी भाजपच्या नगरसेवक सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र उर्फ कन्नु ताजणे याच्यावर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered against Kannu Tajne, who was wearing Dhudgus at Bitco Hospital, at Nashik Road Police Station | बिटको रुग्णालयात धुडगुस घालणाऱ्या कन्नू ताजणेविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

बिटको रुग्णालयात धुडगुस घालणाऱ्या कन्नू ताजणेविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देनाशिकरोड पोलीस ठाण्यात कन्नु ताजणे विरोधात गुन्हा दाखल मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली ताजणे विरोधात फिर्याद

नाशिक :नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात शनिवारी (दि.१६) चारचाकी कार घुसवून धडगूस घालत तोडफोड केल्या प्रकरणी भाजपच्या नगरसेवक सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र उर्फ कन्नु ताजणे याच्यावर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात  राजेंद्र उर्फ कन्नु ताजणे याने शनिवारी सायंकाळी साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास प्रवेशद्वाराची काच तोडून चारचाकी कार रुग्णालयात घुसवून धुडघुस घातला. तसेच गाडीतून खाली उतरल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी व परिचारिकांवर पेव्हर ब्लॉक फेकून मारला. रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांनाही मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणला. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारात शिविगाळ व दमदाडी करून दहशत पसरवली. त्यामुळे रुग्णांची व नातेवाकांची एकच धावपळ उडाली होती. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकरी डॉ. अतुल विजय सोनवणे (४७ ) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र उर्फ कन्नु ताजणे विरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकासन केल्यासह वैद्यकीय सेवा, व्यक्ती व संस्था हिंसककृती तसेच साथरोग सुधारणा कादद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: A case has been registered against Kannu Tajne, who was wearing Dhudgus at Bitco Hospital, at Nashik Road Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.