काेरोना रुग्णवाढीचा एसटीला फटका बसण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:09 AM2021-02-22T04:09:41+5:302021-02-22T04:09:41+5:30

नाशिक : राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. अनलॉकनंतर ...

Carona morbidity is likely to hit ST | काेरोना रुग्णवाढीचा एसटीला फटका बसण्याची शक्यता

काेरोना रुग्णवाढीचा एसटीला फटका बसण्याची शक्यता

Next

नाशिक : राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. अनलॉकनंतर काेरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने अजूनही ३० टक्के मार्गांवरील फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याचा फटका महामंडळालादेखील बसत असून उत्पन्न कमी होत आहे. आता त्यात पुन्हा भर पडण्याची शक्यता आहे.

टप्प्याटप्i्;ो अनलॉक केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळालादेखील प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली. सुरुवातीला जिल्हांतर्गत बस सुरू करण्यात आल्या. त्यानंतर त्यामध्ये काहीशी वाढ करण्यात आली. मात्र, प्रवासीच नसल्याचे सुरू करण्यात आलेल्या अनेक बसच्या फेऱ्या कमी करण्याची वेळ आली. केवळ एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाणाऱ्या बसवर भर देण्यात आला. अंतर्गत वाहतुकीला प्रवासी मिळत नसल्याने अजूनही या बस बंदच आहेत. महामंडळाच्या बस सुरू झाल्या असल्या, तरी शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यांत शहर बस धावत नाहीत. त्याचा फटका शहरात दैनंदिन येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

महामंडळाला अजूनही प्रवासी वाहतुकीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसून सद्य:स्थितीत केवळ ४९ टक्के इतके उत्पन्न मिळत आहे. यातूनच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च यांचा मेळ बसवावा लागत आहे. कमी उत्पन्न झाल्याचा परिणाम महामंडळाच्या कामकाजावर नक्कीच होतो. परंतु, परिस्थिती हळूहळू सुधारत

असल्याचे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने महामंडळाच्या सध्याच्या प्रवासीसंख्येतही दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. --इन्फो--

ना मास्क ना डिस्टन्स...

सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवून बसमध्ये बसावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु, अंमलबजावणी करणारी यंत्रणाच नसल्याने प्रवाशांमध्ये बेफिकिरी दिसून आली. बसमध्ये चढताना आणि उतरताना होणारी चढाओढ पाहता कुणालाच कोरोनाची भीती नसल्याचे दिसते. बसमध्ये मास्क वापरलाच जात नसल्याचे अनेकदा समोर आलेले आहे.

--इन्फो--

लॉकडाऊननंतरही अनेक मार्गांवरील बस रिकाम्याच

उत्पन्न घटले : प्रवासी नसल्याने अनेक मार्गांवरील फेऱ्या बंदच

नाशिक : कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. सुरक्षितता नियमांच्या आधीन राहून बसची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील बस रिकाम्या धावत असून काही मार्गांवरील बस बंद करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. जिल्ह्याला अवघे ४९ टक्के इतके उत्पन्न मिळत असून अजूनही १० टक्के बस सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात ८३२ बसच्या माध्यमातून प्रवासी सेवा सुरू होती. बस सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बस सुरू करण्यात आल्या असल्या, तरी सध्या मार्गावर केवळ ६६७ बस धावत आहेत. नाशिक शहरात महापालिकेने अजूनही बस सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे मनपाची सेवा सुरू नसली, तरी महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात केवळ ५९० बस सुरू केल्या आहेत. उर्वरित जवळपास ७० बस अजूनही बंदच आहेत. याचा फटका शहरालगतच्या गावांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

महामंडळाचे सर्वाधिक उत्पन्न हे यात्रा स्पेशल गाड्यांमधून मिळते. परंतु, यंदा त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा बंदचा फटका महामंडळाला बसला. वणी येथील बसफेऱ्यादेखील बंद करण्याची वेळ आली आहे. पंढरपूर, तुळजापूर, जेजुरीला जाणाऱ्या भाविकांची संख्यादेखील कमी झालेली आहे. त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे.

--इन्फो

पुणे मार्गावरील बस घटल्या

पुण्यातील आयटी पार्क अजूनही बंद असल्यामुळे महामंडळाला त्याचा फटका बसत असतांनाच आता दुसऱ्या टप्प्यातील काेरोनादेखील उद‌्भवल्याने आणखी प्रवासी कमी झाले आहेत. नाशिक ते पुणे हा महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग आहे. मात्र, प्रवासीच नसल्याने या मार्गावरील बसच्या संख्येत कपात करण्यात आलेली आहे. अनेक प्रवासी हे बसचा प्रवास टाळून आपल्या स्वत:च्या वाहनाचा वापर करू लागले आहेत.

--इन्फो--

४९ टक्केच उत्पन्न

महामंडळाला अजूनही प्रवासी वाहतुकीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. उत्पन्न केवळ ४९ टक्के इतके मिळत आहे. ३० टक्dे बस अजूनही बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे. आता कुठे प्रवासी बसने प्रवास करण्याच्या मानसिकतेत आले असताना आता पुन्हा एकदा कोरेानाच्या प्रभावामुळे प्रवाशांनी सावधानता म्हणून बसकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. कमी उत्पन्न झाल्याचा परिणाम महामंडळावर होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महामंडळाला अनेक उपाययोजना कराव्या लागत आहेत.

Web Title: Carona morbidity is likely to hit ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.