खामखेडा परिसरात कोबी लागवडीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 01:05 PM2020-07-14T13:05:39+5:302020-07-14T13:06:13+5:30

खामखेडा : भाजीपाला वर्गीय कोबी पिकाच्या उत्पादनात खामखेडा गाव अग्रेसर असून त्याचे नाव गुजरात राज्यातील भाजीपाला मार्केटमघ्ये नाव प्रसिद्ध असल्याने दर वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.त्यामुळे आता कोबी पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी दिसून येत आहे.

Cabbage cultivation in Khamkheda area is almost | खामखेडा परिसरात कोबी लागवडीची लगबग

nashik

Next

खामखेडा : भाजीपाला वर्गीय कोबी पिकाच्या उत्पादनात खामखेडा गाव अग्रेसर असून त्याचे नाव गुजरात राज्यातील भाजीपाला मार्केटमघ्ये नाव प्रसिद्ध असल्याने दर वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.त्यामुळे आता कोबी पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी दिसून येत आहे.
कोबी लागवड ही साधारण जुलै महिन्यात केली जाते.गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी गावातील ठराविक शेतकरी कोबीची लागवड करीत असे त्यामुळे त्यांना कोबी विक्र ीसाठी गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, आदी ठिकाणी जावे लागत असे. परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात कोबीची लागवड केली जात असल्याने आता गुजरात राज्यातील व्यापारी थेट शेतकºयाच्या बांधावर येऊन कोबीची खेरदी करीत आहे.
काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कोबीची लागवड केली होती. पीक
विक्र ीसाठी तयार झाले आणि सर्वत्र कोरोना व्हायरस रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कोबी खरेदीसाठी व्यापारी आले नसल्याने पिकावर केलेला खर्चही वसूल झाला नाही. तरीसुद्धा काही ठिकाणी शेतकरी पावसाळी कोबी पिकाची लागवड करतांना दिसून येत आहे.
----------------------
गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी या कोबी उत्पादनाने अनेक शेतकºयांचे स्वप्न फुलविले आहे.त्यामुळे या परिसरात शेतकरी हमखास कोबीची लागवड करतो. त्यामुळे गुजरात राज्यातील व्यापारी थेट शेतकºयांच्या बांधावर येऊन कोबी खरेदी करून करीत आहे.यामुळे शेतकºयाला बांधावर रोख पैसे मिळतात. शेतकरयाचे आडत हमाली, व गाडीभाडे तर वाचत त्याच बरोबर वेळेचीही बचत होते. ही कोबी शेतातून काढून ती गोणीत भरून त्या गोंणी गाडीत भरण्यासाठी मजुराची आवश्यकता असते.तेव्हा व्यापारी गावातील काही तरु ण मुलांना शेतातून कोबी काढून ती गोणी गाडीत भरून देण्यासाठी मजूर उपलब्ध करून देतात.तेव्हा त्यांना त्याबदल कमिशन मिळते. त्याच बरोबर स्थानिक मजुराना रोजगार उपलब्ध होतो.

Web Title: Cabbage cultivation in Khamkheda area is almost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.