आगीत ऊस जळून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 06:19 PM2019-06-14T18:19:01+5:302019-06-14T18:19:21+5:30

निताने ता. बागलाण येथील जयंत देवरे यांच्या ऊसाच्या शेतात वीज वाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट होऊन लागलेल्या आगीत मोठया प्रमाणात ऊस जळून खाक झाला. या आगीत ऊसा बरोबरच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रु पयांचे नुकसान झाले.

Burning of sugarcane damages the fire | आगीत ऊस जळून नुकसान

आगीत ऊस जळून नुकसान

Next
ठळक मुद्देशेता वरून गेलेल्या विज वाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट

जायखेडा : निताने ता. बागलाण येथील जयंत देवरे यांच्या ऊसाच्या शेतात वीज वाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट होऊन लागलेल्या आगीत मोठया प्रमाणात ऊस जळून खाक झाला. या आगीत ऊसा बरोबरच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रु पयांचे नुकसान झाले.
निताने शिवारा मध्ये आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शेता वरून गेलेल्या विज वाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट झाल्याने हि आग लागली. आधीच पाणी नसल्याने ऊसाच्या सुकलेल्या पाचटाने तात्काळ जोरात पेट घेतल्याने लागवड क्षेत्रातील निम्या
पेक्षा अधिक ऊस व पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे
पाईप जळाल्याने मोठे नुकसान झाले.
शेजारील शेतकरी महेंद्र देवरे यांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी पं.स.सदस्य वसंत पवार, अमोल देवरे, संजय देवरे, किरण अिहरे, मनू देवरे, केतन खैरनार, पप्पू पवार, दिनेश देवरे, रामकृष्ण देवरे, जीभाऊ देवरे, व परिसरातील शेतकर्यांच्या मदतीने हि आग विझविली. तलाठी एस. एस. भालेराव यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
विजवाहक तारा अत्यंत धोकादायक
निताने व परीसरातील लोंबकळनार्या विजवाहक तारा अत्यंत धोकादायक स्वरूपात असून, या संदर्भात ग्रामस्थ व शेतकर्यांकडून विज वितरण कंपनीस वारंवार सूचित करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी जयंत देवरे यांनी हि त्यांच्या शेतातून गेलेल्या धोकादायक अशा लोंबकळनार्या वीज वाहक तारा दुरु स्त करण्या संदर्भात या आधीच निवेदन दिले आहे. मात्र याकडे संबंधितांकडून डोळेझाक व दुर्लक्ष करण्यात येत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Burning of sugarcane damages the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.