भाऊच ठरला भावाचा वैरी जमिनीच्या वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 04:47 PM2020-09-11T16:47:01+5:302020-09-11T16:47:53+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे सख्या लहान भावाने गुरु वारी (ता.10) सायंकाळी जमिनीच्या वादातून मोठ्या भावास कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केले, शुक्र वारी उपचारादरम्यान जखमी हिरामण खादे यांची प्राणज्योत मालवली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी ह्यास पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

The brother became the enemy of the brother and was killed in a land dispute | भाऊच ठरला भावाचा वैरी जमिनीच्या वादातून खून

भाऊच ठरला भावाचा वैरी जमिनीच्या वादातून खून

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे सख्या लहान भावाने गुरु वारी (ता.10) सायंकाळी जमिनीच्या वादातून मोठ्या भावास कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केले, शुक्र वारी उपचारादरम्यान जखमी हिरामण खादे यांची प्राणज्योत मालवली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी ह्यास पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.
हिरामण लक्ष्मण खादे (40) यांनी आपल्या लहान भाऊ लालू लक्ष्मण खादे (36) यांच्यात जमिनीच्या हिस्स्यावरून सतत कुरबुर होत होती गुरु वारी सायंकाळी यावरून दोघांत कडाक्याचे भांडण सायंकाळी झाले. दरम्यान लालू याने जर जमीन देणार नसेल तर तुझा मुडदा पाडतो, तुला जिवंत सोडणार नाही असे ठणकावले होते. यावरून दोघांत झालेल्या वादाने सायंकाळी लालू याने रागाच्या भरात आपल्या घरातील धारदार कोयत्याने हिरामण याच्या डोक्यात वार करत गंभीर जखमी केले.
दरम्यान हिरामण यांची पत्नी लिलाबाई हिने आरडा ओरडा करत शेजारी असलेल्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले नागरिक आल्याचे पाहून संशियत आरोपी फरार झाला. जखमी हिरामण खादे ह्यास तातडीने उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्याने शुक्र वारी साडेबारा वाजता हिरामण यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. घोटी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे उपनिरीक्षक संजय वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवलदार शितलकुमार गायकवाड, आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. संशियत आरोपीस पोलीस आल्याची माहिती मिळताच पळून जाण्याच्या तयारीत असतांना पथकाने शितापिने संशियत आरोपी लालू खादे ह्यास अटक केली.
 

Web Title: The brother became the enemy of the brother and was killed in a land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.