तपोवन : कुजलेल्या अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 02:34 PM2020-12-13T14:34:52+5:302020-12-13T14:38:51+5:30

शहरातील सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता महिलांची माहितीची चाचपणी पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे.

The body of the girl was found in a decomposed state | तपोवन : कुजलेल्या अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह

तपोवन : कुजलेल्या अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह

Next
ठळक मुद्देधारधार हत्याराने संशयिताने केला खूनपोलिसांना ओळख पटविणे अवघड होत आहे

नाशिक : तपोवन-टाकळी रस्त्यावर आठवडाभरापुर्वी अज्ञात संशयिताने एका युवतीच्या डोक्यावर धारधार शस्त्राने हल्ला करत ठार मारुन मृतदेह निर्जन ठिकाणी मोकळ्या मैदानात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने अद्याप युवतीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीनारायण पुलाच्या अलीकडे गोदाकाठालगत थेट रामटेकडीच्या पायथ्याला असलेल्या निर्जन भागातील मैदानातील गवतामध्ये वय वर्षे १७ ते २५च्या आतील स्त्रीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, पोलीस निरिक्षक दत्ता पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाच्या शरीरावरील कपडेही फाटलेले आढळून आले. तसेच कुठल्याहीप्रकारे कोणतेही कागदपत्र आजुबाजुला आढळून आले नसल्याने तसेच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने पोलिसांना ओळख पटविणे अवघड होत आहे. शहरातील सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता महिलांची माहितीची चाचपणी पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे. डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्यामुळे अनोळखी महिलेचा मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पवार करीत आहेत.

Web Title: The body of the girl was found in a decomposed state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.