येवल्यात रंगणार निळू फुले नाट्य करंडक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 05:16 PM2020-01-18T17:16:12+5:302020-01-18T17:16:26+5:30

२९ फेबु्रवारीपासून आयोजन : रोख पारितोषिकांची मेजवानी

 Blue Flower Drama Trophy Contest | येवल्यात रंगणार निळू फुले नाट्य करंडक स्पर्धा

येवल्यात रंगणार निळू फुले नाट्य करंडक स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार सुरु करण्यात आलाआहे. 

येवला : अखिल भारतीय नाट्य परिषदेची नाशिक शाखा आणि रंगभूमी येवला यांच्या संयुक्त विद्यमाने नटश्रेष्ठ निळू फुले नाट्य करंडक महोत्सव यावर्षी २९ फेबु्रवारी आणि १ मार्च रोजी येवला येथे आयोजित करण्यात आला असून दुसरे वर्ष असणाऱ्या या स्पर्धेसाठी विजेत्यांना रोख पारितोषिकांनी गौरविले जाणार आहे.
स्पर्धेला वयाची आणि शालेय बंधनाची अट नाही. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालय अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे. त्याच प्रमाणे विविध संस्था क्लब किंवा संघटीत ग्रुप देखील यात सहभागी होऊ शकतील. मुख्य म्हणजे या स्पर्धेत सादर करावयाच्या एकांकिकेत दोन किंवा दोन पेक्षा अधिक पात्र असणे आवश्यक आहे. या स्पर्धा आयोजित करण्याकरिता डॉ. महेश्वर तगारे यांचे अध्यक्षतेखाली स्वतंत्र कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात असून या कार्यकारी समितीत आनंद शिंदे, श्रीकांत खंदारे, शंकर अहिरे, डॉ.गोविंदराव भोरकडे, प्रा.शरद पाडवी, अविनाश पाटील, अझर शहा, पंकज सोनवणे, शुभम शिंदे, डॉ.भूषण शिब्दनकर, किशोर सोनवणे, निर्मला कुलकर्णी-गुंजाळ , रंजना चौधरी-भोये, विनता वाघ-शिनगारे आदींचा समावेश आहे. नटश्रेष्ठ निळू फुले नाट्य करंडक हा सर्वोत्कृष्ट समूहाला देण्यात येणार असून ५ हजार रुपये रोख आणि नटश्रेष्ठ निळूफुले यांची प्रतिमा असलेला करंडक देऊन सन्मानित केले जाणार आहे. याच स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचाही पुरस्कार दिला जाणार असून यंदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार सुरु करण्यात आलाआहे.  या स्पर्धा महात्माफुले नाट्यगृह,विंचूर रोड येथे होणार आहेत. नाट्य स्पर्धेचे पुरस्कार वितरण चित्रपट अभिनेते आणि चला हवा येउ द्या फेम भारत गणेशपुरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

Web Title:  Blue Flower Drama Trophy Contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.