बंदचा फळभाज्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:24 AM2021-04-10T01:24:59+5:302021-04-10T01:26:03+5:30

मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.

Blow off fruits and vegetables | बंदचा फळभाज्यांना फटका

बंदचा फळभाज्यांना फटका

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा हात आखडता : दरामध्ये वाढ

नाशिक : मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. शनिवार, रविवारी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यातच मुुंबईत दादर, ठाणे आदी भागांमध्ये किरकोळ विक्रीला बंदी असल्यामुळे घेतलेला माल जाईल किंवा नाही याची धास्ती असल्यामुळे अनेक भाजीपाला व्यापारी हात राखूनच माल खरेदी करीत असल्याने फळभाज्यांच्या दरामध्ये घसरण झाली असल्याचे नाशिक येथील अडतदारांनी सांगितले. 
किवी २५० रु. किलो
कोरोनामुळे फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्वच फळांचे दर वाढले आहेत. किवी, संत्रा या फळांना चांगली मागणी असून, किवी २०० ते २५० रुपये, तर संत्रा १३० ते १५० रुपये किलो या दराने विकला जात आहे. डाळिंब १२५ ते १५० रुपये किलोने विकले जात आहे.

Web Title: Blow off fruits and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.