शुभ्र फुलांनी बहरली डोंगरची काळी मैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 09:26 PM2020-02-29T21:26:33+5:302020-02-29T21:29:46+5:30

पेठ : डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदºयात बहरू लागली असून, या काळ्या मैनेला पांढºया फुलांचा बहर आला आहे. ऐन उन्हाळ्यात हा रानमेवा तयार होऊ पाहत असल्याने आगामी दोन महिने या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येणार आहे.

The black maina of the mountains blossomed with white flowers | शुभ्र फुलांनी बहरली डोंगरची काळी मैना

पांढऱ्या शुभ्र फुलांनी बहरलेली डोंगरची काळी मैना

Next
ठळक मुद्देरानमेवा । ऐन उन्हाळ्यात खवय्यांना मिळणार आस्वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदºयात बहरू लागली असून, या काळ्या मैनेला पांढºया फुलांचा बहर आला आहे. ऐन उन्हाळ्यात हा रानमेवा तयार होऊ पाहत असल्याने आगामी दोन महिने या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येणार आहे.
फाल्गुन महिना सुरू झाल्यानंतर प्रथम दर्शन होते ते डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या करवंदाच्या फुलांचे. डोंगरावर सध्या पांढºया फुलांनी झाडे सर्वांना आकर्षित करीत असून, फुले गळून पडल्यावर हिरव्या रंगाचे करवंद घडेघड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो.
आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करीत असतात. या भागातील करवंदे नाशिक, मालेगावपासून
तर जळगावपर्यंत पाठविली जातात, मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाट्टेल त्या भावात करवंदे खरेदी करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेताना दिसून येतात. तर लहान बालके व वृद्ध महिला पळसाच्या पानांचे द्रोण भरून दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून करवंदे विक्र ी करतात.करवंदापासून करतात लोणचे
आंब्याचा मोसम सुरू होण्यापुर्वीच करवंदाचा मोसम सुरू होत असल्याने कच्च्या करवंदापासून चांगल्या प्रतीचे लोणचे तयार करता येते. काही वर्षांपूर्वी सावर्णे येथील महिला बचतगटाने करवंदापासून लोणचे तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला होता, मात्र पाहिजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने बाळसं धरण्यापूर्वीच हा उद्योग डबघाईस आला. आदिवासी बेरोजगार तरु ण व महिलांना करवंदापासून विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे तंत्रज्ञान व तयार केलेला माल विक्र ीसाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास हक्काचा रोजगार मिळू शकतो.

 

Web Title: The black maina of the mountains blossomed with white flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.