मराठा आरक्षणासाठी भाजपचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:19 AM2020-09-19T00:19:04+5:302020-09-19T01:32:44+5:30

सिन्नर : मराठा समाज आरक्षणाला मिळालेली स्थगिती राज्य शासनाने त्वरित उठवावी या मागणीसाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. 

BJP's fast for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी भाजपचे उपोषण

सिन्नर तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी आत्मक्लेश उपोषण करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, किशोर देशमुख, रामनाथ डावरे, सविता कोठूरकर यांच्यासह कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देसिन्नर : न्यायालयाने स्थगिती उठविण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : मराठा समाज आरक्षणाला मिळालेली स्थगिती राज्य शासनाने त्वरित उठवावी या मागणीसाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. 
गेल्या भाजप सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण दिले होते, असा दावा उपोषणकर्त्यांनी केला. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. राज्य शासनाने सदर स्थगिती त्वरित उठवावी, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत स्थगिती उठविली जात नाही तोपर्यंत राज्य शासनाने कोणतीही नोकरभरती करू नये तसेच शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी केली.आरक्षणातील बारकावे योग्य पद्धतीने न मांडल्याचा आरोपआरक्षणातील बारकावे योग्य पद्धतीने न्यायालयात मांडले न गेल्याने आरक्षाला स्थगिती मिळाल्याचा आरोपही करण्यात आला. निवेदन तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, किशोर देशमुख, भाऊसाहेब शिंदे, रामनाथ डावरे, बहिरू दळवी, ज्ञानेश्वर कुºहाडे, प्रमोद उगले, आकाश शिंदे, सजन सांगळे, निवृत्ती शिरोळे, विवेक मोरे उपस्थित होते.

Web Title: BJP's fast for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.