भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:20 AM2019-09-22T01:20:42+5:302019-09-22T01:21:17+5:30

भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.

BJP's current strength is limited ...! | भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...!

भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...!

Next
ठळक मुद्देसध्या चार आमदार । १९९० चीच स्थिती; आता खरी परीक्षा

नाशिक : भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.
१९८० साली भाजपची स्थापना झाल्यानंतर सतत विरोधी पक्षात राहिलेल्या पक्षाने आज मोठी मजल मारली असून, देशात तसेच राज्यात सत्तेत आहे; परंतु नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर सध्याच्या स्थितीत सुवर्णकाळ असताना एकूण पंधरा मतदारसंघांमध्ये चारपेक्षा अधिक भाजपचे आमदार नाहीत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९८० मध्ये येवल्यातून पक्षाचे भानुदास कदम यांनी येवला मतदारसंघातून तर (कै.) गणपतराव काठे यांनी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविली; मात्र त्यात दोघांचा पराभव झाला होता. पक्षाला चांगले घवघवीत यश मिळाले ते १९८५ मध्ये. यावेळी भाजपचे प्रथमच तीन उमेदवार विजयी झाले. पक्ष स्थापनेनंतर भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेले हे पहिले मोठे यश होते; परंतु त्यापेक्षा एक जागा अधिक मिळवून पक्षाने १९९० मध्ये बाजी मारली. अर्थात, हे सर्व करतानाच शिवसेना आणि भाजपची युती होतीच. १९९५ मध्ये युतीची सत्ता राज्यात आली. त्यावेळी खरे तर भाजपला अधिक जागा मिळणे अपेक्षित होते; परंंतु अवघ्या तीन जागा मिळाल्या. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. दौलतराव आहेर यांचा विजय झाला. तर २००४ मध्ये त्यांचा पराभव कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी केला. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन मतदारसंघ वाढले आणि मनसेचे तीन आमदार निवडून आले. देवळालीची जागा अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने राखली. आता युतीबाबत चर्चा सुरू असली तरी भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
२०१४ मध्ये झालेल्या मोदी लाटेत भाजपचे नशीब फळफळले आणि सेनेशी युती नसताना शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपला यश मिळाले. त्याचप्रमाणे चांदवड, देवळा या मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांना संधी मिळाली. अर्थात, भाजपचे सुसाट वारे असतानाही भाजपला चार आमदारांच्या पलीकडे उमेदवार निवडून आणता आले नाही. १९९० मध्ये हीच स्थिती होती. त्यापलीकडे भाजप प्रभावी ठरू शकलेला नाही.

Web Title: BJP's current strength is limited ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.