छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्याची भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 08:55 PM2020-09-10T20:55:49+5:302020-09-11T00:46:06+5:30

येवला : शहरात नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

BJP demands to start work on Chhatrapati Shivaji Maharaj memorial | छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्याची भाजपची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्याची भाजपची मागणी

Next
ठळक मुद्देस्मारकासाठी १३ सप्टेंबर २०१९ ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरात नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर स्मारकासाठी १३ सप्टेंबर २०१९ ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर 75 लाख पैकी 40 लाखाचा निधीही वर्ग केलेला आहे. सदर निधी ३१ मार्च २०२० पर्यंत खर्च करायचा होता, मात्र यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आलेली नाही. यामुळे तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये नाराजी असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.
या स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी व शिवप्रेमी नागरिक आंदोलन करतील असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, प्रांतीक सदस्य बाबा डमाळे, आनंद शिंदे, प्रा. नानासाहेब लहरे, गोरख खैरनार, दिनेश परदेशी, छगन दिवटे, युवराज पाटोळे, मिननाथ पवार, मयूर मेघराज, संतोष काटे, संतोष केंद्रे, संजय जाधव, महेश पाटील, बाळासाहेब शिंदे, केदारनाथ वेलांजकार, मंगेश कांबळे, अ‍ॅड. योगेश नाजगड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 

Web Title: BJP demands to start work on Chhatrapati Shivaji Maharaj memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.