शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 03:18 PM2020-09-28T15:18:10+5:302020-09-28T15:18:46+5:30

मालेगाव :- परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, वीज बिल माफ करावे, दोन लाखांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्यावर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे राज्य शासनाच्या कृषी विरोधी धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे .

BJP demands compensation to farmers | शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची भाजपची मागणी

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना देतांना भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी गिल,समाधान हिरे,निलेश कचवे,नितीन सुमराव आदी.

Next
ठळक मुद्देराज्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांची लढा देत आहे

मालेगाव : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, वीज बिल माफ करावे, दोन लाखांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्यावर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे राज्य शासनाच्या कृषी विरोधी धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे .परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची दैना केली आहे कोरोनामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे केंद्र शासनाकडून राज्य शासनाला निधी दिला जातो मात्र कोविड च्या नावाखाली या निधीवर डल्ला मारला जात आहे राज्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांची लढा देत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे बनले आहे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी वीज बिल माफ करावे कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अशी मागणी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य लकी गिल, जिल्हा उपाध्यक्ष समाधान हिरे, तालुकाध्यक्ष निलेश कचवे, नितीन सुमनराव आदींसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


(फोटो 28 मालेगाव 3)


 

 

Web Title: BJP demands compensation to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.