बिटकोत सर्वच आजारावरील उपचार व्हावेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:38 PM2020-10-11T23:38:03+5:302020-10-12T01:19:08+5:30

नाशिकरोड: बिटको रूग्णालय हे भविष्यात सर्वच प्रकारच्या आजारावर उपचार करणारे रूग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी देखील रूग्णालय पुरक ठरू शकेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Bitcoins should be used to treat all ailments | बिटकोत सर्वच आजारावरील उपचार व्हावेत 

बिटकोत सर्वच आजारावरील उपचार व्हावेत 

Next
ठळक मुद्देपालकमंत्री: वैद्यकीय महाविद्यालयासाठी योग्य हॉस्पीटल

नाशिकरोड: बिटको रूग्णालय हे भविष्यात सर्वच प्रकारच्या आजारावर उपचार करणारे रूग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी देखील रूग्णालय पुरक ठरू शकेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयाची पालकमंत्री भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, आरोग्य उपसंचालक मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. जितेंद्र धनेश्वर आदी उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर बिटको रुग्णालयामध्ये सर्व आजारांचे निदान होईल अशा सुविधा निर्माण करण्यात येऊन सर्व आजारांवर एकाच छताखाली रुग्णांना उपचार कसे मिळतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले पाहिजे. शहराच्या महत्वाच्या ठिकाणी हे रुग्णालय असल्या कारणाने येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टिने देखील नियोजन होऊ शकत असे ते म्हणाले.

जिल्'ाची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी येथील रूग्णालयात प्रामुख्याने शस्त्रक्रीया, आधुनिक पद्धतीने विविध वैद्यकीय तपासण्या करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून कोणीही रुग्ण उपचारांपासुन वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोविड काळात रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा व्यावस्थित होण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात कोविड तसेच इतर रुग्णांसाठी उपयोगात येण्यासाठी साधारण १९ किलो लिटर आॅक्सिजनसाठा असलेली सर्वात मोठी टाकी बसविण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसाठी झटणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांची भेट घेत भुजबळ यांनी आभार मानले.

पाहणी दरम्यान बिटको रुग्णालयात १०० आॅक्सिजन बेडस् सुरू असून ५० बेडस् तयार आहेत.या व्यतिरिक्त देखील नव्याने २०० बेडस् उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

(फोटो प्रशांतने मेल केले आहेत)

 

Web Title: Bitcoins should be used to treat all ailments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.