ग्रामिण रु ग्णालयातच होणार जन्म-मृत्युचीनोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:09 PM2020-02-09T18:09:44+5:302020-02-09T18:10:25+5:30

सटाणा:शासन आदेशानुसार दि .१जानेवारी २०२० पासून ग्रामिण रु ग्णालयात घडणा - या जन्म किंवा मृत्यु घटनांची नोंद करण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक यांना जन्म मृत्यु निबंधक म्हणून घोषीत केले आहे.त्यामुळे ग्रामिण रु ग्णालयात घडणाऱ्या जन्म आणि मृत्युच्या नोंदी या ग्रामिण रु ग्णालयातच होणार असून या नोंदीचे प्रमाणपत्रही ग्रामिण रु ग्णालयामार्फतच उपलब्ध होणार असल्याचे पालिकेच्या मुख्याधिकारी डगळे-हिले यांनी स्पष्ट केले आहे.

 Birth-and-death records will be held at the Rural Hospital | ग्रामिण रु ग्णालयातच होणार जन्म-मृत्युचीनोंद

ग्रामिण रु ग्णालयातच होणार जन्म-मृत्युचीनोंद

Next
ठळक मुद्देसटाणा:नांव दाखल करण्याची अखेरची संधी 

सटाणा:शासन आदेशानुसार दि .१जानेवारी २०२० पासून ग्रामिण रु ग्णालयात घडणा - या जन्म किंवा मृत्यु घटनांची नोंद करण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक यांना जन्म मृत्यु निबंधक म्हणून घोषीत केले आहे.त्यामुळे ग्रामिण रु ग्णालयात घडणाऱ्या जन्म आणि मृत्युच्या नोंदी या ग्रामिण रु ग्णालयातच होणार असून या नोंदीचे प्रमाणपत्रही ग्रामिण रु ग्णालयामार्फतच उपलब्ध होणार असल्याचे पालिकेच्या मुख्याधिकारी डगळे-हिले यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाने जन्म नोंदीत नांव दाखल करण्याची अखेरची संधी पालिकांमार्फत उपलब्द्ध करून दिली आहे.सन १९६९ पुर्वी अथवा नंतर जन्मलेल्या परंतु जन्म नोंदणीत नावाची नोंद नसलेल्या नागरिकांना आपल्या नावानिशी जन्म नोंदणी करता येणार आहे. याबाबतराज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधक अध्यादेश जारी केला असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे ङ्क्तहिले यांनी केले आहे .

येत्या दि.१४ मे नंतर वंचीत राहिलेल्यांना जन्म नोंदीत नांव दाखल करता येणार नाही असेही अध्यादेशात स्पष्ट केले आहे . पुर्वीच्या काळी रु ग्णालयात जन्म होवूनही अनेकांनी जन्म दाखले घेतलेले नसतील अथवा मिळाले नसतील . त्यामुळे नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंद करु न जन्म दाखले मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे . ज्या नागरिकांची जन्माची नोंदणी ही दि.१ जानेवारी२००० पुर्वी झालेली आहे , तसेच ज्यांच्या नोंदणीला १५ वर्षाचा कालावधी लोटला आहे , अशा सर्व नागरिकांना जन्म नोंदणीत बालकाचे नांव दाखल करण्याची संधी उपलब्ध झाली आहे . ही मुदत फक्त दि.१४ मे२०२० पर्यन्तच उपलब्ध असून त्यांनतर कुठल्याही परिस्थितीत बाळाचे नांव दाखल करण्याचा कालावधी वाढवून मिळणार नाही अशा सुचना शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म मृत्यु उपमुख्य निबंधकांनी एका अधिसुचनेद्वारे जाहीर केले आहे . नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला , शैक्षणकि प्रमाणपत्र . पासपोर्ट , पॅनकार्ड , आधारकार्ड यापैकी एका पुराव्यासह जन्म - मृत्यु नोंदणी कार्यालयात अर्ज सादर करु न जन्म नोंदीत नांव समाविष्ट झाल्याची खात्री करु न घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .

Web Title:  Birth-and-death records will be held at the Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.