Bhiwandi sticks to rape scapegoat after showing rains of money | पैशांच्या पावसाचे आमीष दाखवून बलात्कार करणाऱ्या भोंदूला भिवंडीमध्ये ठोकल्या बेड्या
पैशांच्या पावसाचे आमीष दाखवून बलात्कार करणाऱ्या भोंदूला भिवंडीमध्ये ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देसंशयितांविरोधात बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा

नाशिक : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी संशयित भोंदू विनोदबाबा ऊर्फ तुकाराम राधाकृष्ण हिरे (४७, रा. ओझर) याच्या पोलिसांनी भिवंडी येथून मुसक्या आवळल्या. त्यास बुधवारी (दि.१४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात भोंदूबाबासह त्याचे दोन साथीदारही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ध्रुवनगर येथील एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये विनोद हा पीडित महिलेला घेऊन राहात होता. या महिलेला झटपट श्रीमंती मिळवून देण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष संशयित विनोदसह त्याच्या काही साथीदारांनी दाखविल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे. विनोदबाबा याने बनावट पद्धतीने लग्न केल्याचे एक पूजा करून भासविले आणि पीडितेसोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवून बलात्कार केल्याचाही आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला भोंदूबाबाचे साथीदार राजेंद्र दामोदर गायकवाड (५३, रा. आंबे जानोरी), अशोक ऊर्फनाना पिराजी पवार (रा. ओझर) यांना अटक केली. त्यानंतर तपासाला गती देत भिवंडीमध्ये भोंदूबाबा असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पथकाने थेट भिवंडी गाठून त्यास बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यातील विनोद भोंदूबाबाची महिला साथीदार अद्याप फरार आहे.


Web Title: Bhiwandi sticks to rape scapegoat after showing rains of money
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.