जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 06:44 PM2020-06-30T18:44:06+5:302020-06-30T18:46:30+5:30

जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र माधवराव पाटील यांची निवड करण्यात आाली आहे. बँकेच्या स्थापनेपासून  माधवराव पाटील हेच अध्यक्ष होते. त्यांचे निधन झाल्यानंतर सहकार कायद्यानुसार नविन अध्यक्ष निवड सहकार अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली जनलक्ष्मी बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली.

Bhalchandra Patil as the Chairman of Janlaxmi Bank | जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड

जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड

Next
ठळक मुद्देजनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र माधवराव पाटील संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड

नाशिक : माजी खासदार दिवंगत माधवराव पाटील यांनी १९७६ साली स्थापन केलेल्या जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र माधवराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जनलक्ष्मी बँकेच्या स्थापनेपासून  माधवराव पाटील हेच अध्यक्ष होते. त्यांचे निधन झाल्यानंतर सहकार कायद्यानुसार नविन अध्यक्ष निवड सहकार अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली जनलक्ष्मी बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी बँकेच्या अध्यक्षपदी उद्योजक व्यावसायिक भालचंद्र माधवराव पाटील यांची निवड करण्यात आली. बँकेचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक उत्तम कांबळे यांनी त्यांचे नाव सुचनवे, त्यास ज्येष्ठ संचालक रामरतन करवा यांनी अनुमोदन दिले. जनलक्ष्मी बँकेने महाराष्ट्रासह नाशिककरांना ४२ वर्षे सेवा दिली आहे. शहराबाहेरील काही खाजगी,सहकारी व मल्टीस्टेट बँकांनी नाशिक शहरात स्पर्धा निर्माण केली आहे.स्पर्धेच्या युगात टीकायचे असेल तर आधुनिक व्यवस्थापन,कुशल कर्मचारी वर्ग, व्यवसाय वाढीकरता झटणारे संचालक मंडळ व नाशिककरांची साथ घेऊन नाशिककरांसाठी स्थापन झालेली ही बँक यापुढेही सर्वसामान्यांना मदत करीत राहील असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी दिले. यावेळी ज्येष्ठ संचालक जयंत जानी, उत्तम उगले, संदीप नाटकर, श्रीकांत रहाळकर, रमेश चांदवडकर, अनुराधा केळकर, स्वप्ना निंबाळकर,संजय चव्हाण, रविंद्र अमृतकर, शरद गांगुर्डे, सतिश सोनवणे, मिलिंद पोफळे यांच्यासह अधिकारी मोहन गवळी, अजित मांडवगने आदी उपस्थित होते.

Web Title: Bhalchandra Patil as the Chairman of Janlaxmi Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.