भगूरकर मतदार नोंदणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:22 AM2020-09-10T00:22:25+5:302020-09-10T01:18:33+5:30

भगूर : जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, आयोगाकडून अंतिम मतदार यादी काही दिवसांत जाहीर केली जाणार असताना भगूर शहरात नगरपालिका क्षेत्रात मात्र गेल्या पाच वर्षांत एकदाही मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली नसल्याची तक्रार शिवसेनेने केली असून, या उदासीनतेला जबाबदार कोण, असा सवाल माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी केला आहे.

Bhagurkar deprived of voter registration | भगूरकर मतदार नोंदणीपासून वंचित

भगूरकर मतदार नोंदणीपासून वंचित

Next
ठळक मुद्देपाच वर्षांत बीएलओचे दर्शन नाही : शिवसेनेची तक्रार

भगूर : जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, आयोगाकडून अंतिम मतदार यादी काही दिवसांत जाहीर केली जाणार असताना भगूर शहरात नगरपालिका क्षेत्रात मात्र गेल्या पाच वर्षांत एकदाही मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली नसल्याची तक्रार शिवसेनेने केली असून, या उदासीनतेला जबाबदार कोण, असा सवाल माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी केला आहे.
भगूर नगरपालिका हद्दीत आजवर नवीन मतदार नोंदणी अथवा मयत, दुबार नावे कमी करण्यात आलेली नाही. त्यामुळे वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेले शेकडो तरुण मतदानापासून वंचित राहात आहेत. त्याचबरोबर मतदार यादीत नाव असूनही चुकीचा पत्ता, चुकीचे नावे यादीत असल्याने जुन्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. भगूर शहरासाठी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी पंधरा ते वीस बीएलओची नेमणूक तहसीलदार कार्यालयाने केलेली असून, नवीन मतदार नोंदणीच्या कामासाठी बीएलओंना शासनाकडून मानधनही दिले जात आहे. मात्र आजवर एकदाही एकही बीएलओ मतदाराच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही. आयोगाने भगूरला विशेष मोहीम राबवून मतदार यादीचे अद्ययावतीकरण करावे, अशी मागणी नगराध्यक्ष अनिता करंजकर, काकासाहेब देशमुख आदिंंनी केली आहे.निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार दरवर्षी नवीन मतदारांची नोंदणी केली जाते तसेच मतदार यादी दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला जातो. असे असताना भगूर नगरपालिका हद्दीत मात्र आयोगाच्या कोणत्याही कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे मतदार यादीच्या अद्ययावतीकरणापासून भगूरकर वंचित राहात असून, सप्टेंबर महिन्यात आयोग अंतिम मतदार यादी जाहीर करणार आहे,

Web Title: Bhagurkar deprived of voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.