सुभाष शेवाळे यांना सर्वात्कृष्ठ अपराध सिध्दी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 11:48 PM2020-11-28T23:48:56+5:302020-11-29T01:01:10+5:30

कळवण : पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील १७ उत्कृष्ट तपास केलेल्या गुन्हयाची निवड केली असुन निवड झालेल्या गुन्ह्यात वणी पोलीस स्टेशनमधील अल्पवयीन मुलीचा बलात्कार व खून केलेल्या गु्ह्याचाचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास कळवणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डी. आर. पाटील व त्यांचे क्राईम रायटर पोलीस हवालदार सुभाष शेवाळे यांनी केला होता.

Best Crime Achievement Award to Subhash Shewale | सुभाष शेवाळे यांना सर्वात्कृष्ठ अपराध सिध्दी पुरस्कार

सुभाष शेवाळे

Next
ठळक मुद्देगुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबददल अधिकारी व कर्मचारी यांना अनुक्रमे १० हजार व ५ हजार रुपये रोख रुपयाचे बक्षिस

कळवण : पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील १७ उत्कृष्ट तपास केलेल्या गुन्हयाची निवड केली असुन निवड झालेल्या गुन्ह्यात वणी पोलीस स्टेशनमधील अल्पवयीन मुलीचा बलात्कार व खून केलेल्या गु्ह्याचाचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास कळवणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डी. आर. पाटील व त्यांचे क्राईम रायटर पोलीस हवालदार सुभाष शेवाळे यांनी केला होता.

संबधीत अधिकारी व कर्मचारी यांनी अतिशय किचकट तसेच गुंतागुंतीच्या या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करुन आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयानेआरोपीना फाशीची शिक्षा सुनावली. गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबददल अधिकारी व कर्मचारी यांना अनुक्रमे १० हजार व ५ हजार रुपये रोख रुपयाचे बक्षिस जाहीर केले आहे. लवकरच सदर पुरस्काराचे वितरण अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांचे कार्यालयात होणार आहे. 

Web Title: Best Crime Achievement Award to Subhash Shewale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.