पास्ते येथे पीक नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या ग्रामसेवकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:52 PM2019-11-05T23:52:24+5:302019-11-05T23:52:46+5:30

सिन्नर : परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करत असताना ग्रामसेवकास एकाने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यातील पास्ते शिवारात काकड मळा परिसरात घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Beating a village servant who was doing crop damage at Pasta | पास्ते येथे पीक नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या ग्रामसेवकास मारहाण

पास्ते येथे पीक नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या ग्रामसेवकास मारहाण

Next
ठळक मुद्देरात्री उशिरा संशयिताविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करत असताना ग्रामसेवकास एकाने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यातील पास्ते शिवारात काकड मळा परिसरात घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पास्ते येथील ग्रामसेवक जयवंत साखरे यांना पीक नुकसानीचे पंचनामे करत असताना रविवारी दुपारी अशोक विष्णू घुगे (रा. पास्ते) या इसमाने अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून मारहाण केली. ग्रामसेवक साखरे यांच्यावर दोडी येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय तपासणी केली.
संशयिताची लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.संशयिताविरोधात गुन्हा दाखलघटनेचा निषेध करत घटनेची माहिती ग्रामसेवक संघटनेचे शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे यांना दिली. तहसीलदार कोताडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. आणि फिर्याद दाखल करणेकामी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी झाल्या प्रकाराची माहिती घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी तात्काळ जयवंत साखरे यांना दूरध्वनी करून विचारपूस केली. त्यानंतर रात्री उशिरा संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Beating a village servant who was doing crop damage at Pasta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.