शताब्दी साजरी करणारी बॅसीन कॅथॉलिक बॅँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 01:02 PM2019-12-15T13:02:43+5:302019-12-15T13:03:02+5:30

गेल्या वीस वर्षांत बॅँकेने मोठी झेप घेतली आहे. परदेशात नोकरी करणाऱ्या अनेक मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी बॅँक मदत करत आली आहे. सभासदांना वैद्यकीय मदत बॅँक देते. समाजपरिवर्तनाचे काम बॅँकेने हाती घेतले आहे. सामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बॅँकेने मोलाचे योगदान दिले आहे.

 Basin Catholic Bank celebrating the centenary | शताब्दी साजरी करणारी बॅसीन कॅथॉलिक बॅँक

शताब्दी साजरी करणारी बॅसीन कॅथॉलिक बॅँक

googlenewsNext

माल्कोलम कोलाको

गेल्या वीस वर्षांत बॅँकेने मोठी झेप घेतली आहे. परदेशात नोकरी करणाऱ्या अनेक मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी बॅँक मदत करत आली आहे. सभासदांना वैद्यकीय मदत बॅँक देते. समाजपरिवर्तनाचे काम बॅँकेने हाती घेतले आहे. सामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बॅँकेने मोलाचे योगदान दिले आहे. बॅँकेची सहकार क्षेत्रातील वाटचाल वैशिष्ट्यपूर्ण आहे. गरजू लोकांना अर्थसाहाय्य उपलब्ध करण्याबरोबरच सामाजिक उपक्र मांमध्येही बॅँक सहभागी होत असते. माहिती तंत्रज्ञान व उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक सेवा देणे, आघाडीची बॅँक होणे, सभासदांना आधुनिक व पायाभूत सुविधा देणे, बॅँकेचा गोवा व दीव-दमण येथे शाखाविस्तार करणे आदी उद्दिष्टे बॅँकेने ठेवली आहेत. वसई येथील बॅसीन कॅथॉलिक को- आपरेटिव्ह बँक आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. १८१८ साली तुटपुंज्या भागभांडवलावर सुरू झालेली ही पतसंस्था आता दहा हजार कोटींची उलाढाल करत आहे. भारतात ५४ शेड्युल्ड बॅँका आहेत. त्यातील पहिल्या दहांमध्ये या बॅँकेचा समावेश आहे. बॅँकेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार मिळाला आहे. ही बॅँक आर्थिकदृष्ट्या सक्षम व सुव्यवस्थापित झाली आहे. एकाच छताखाली सर्व सेवा, पारदर्शी कारभार, लोकांचा विश्वास, ग्राहकांना आॅनलाइन पेमेन्ट, पीओएस, ई कामर्स, मोबाईल बँकींग, ई लाबी, फारेक्स सर्व्हिस, नेट बँकींग, म्युचवल फंड आदी अत्याधुनिक सुविधा ही बँकेची वैशिष्ट्य आहेत. बँकेची शाखा जेलरोड येथे आहे.
वसई परिसरात गेल्या शंभर वर्षांपासून बँक करीत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. शंभर वर्षापूर्वी फादर पी. जे. मोनिस यांनी काही सहका-यांना बरोबर घेऊन बॅसीन कॅथालिक को आपरेटिव्ह क्र ेडीट सोसायटीची स्थापना केली. ते धर्मगुरु होते. मात्र, ते केवळ चर्चममध्ये रमणारे पुजारी नव्हते. भाविकांची वर्तमान भौतिक जीवनाची वाट सुकर करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. सहकारी तत्वावर अर्थव्यवहार ही संकल्पनाचा कोणाला ठाऊक नव्हती, त्यावेळी मोनीस यांनी समाजाच्या गळ्यात ती उतरविली. बँकेचा आता वटवृक्ष झाला आहे. कॅथालिक चर्चच्या मूलभूत तत्वांना व शिकवणुकीला धरु न या संस्थाचा कारभार सुरु आहे.
२०१५ ते २०२० या कालावधीसाठी ओनिल आल्मेडा अध्यक्ष, युरी डॉ. घोन्सालविस उपाध्यक्ष आहेत. या संचालक मंडळात डॉमणिक डिमेलो, गोन्साल तुस्कानो, रायन फर्नांडिस, ब्रायन नरोन्हा, बेनाल्ड डायस, मनवेल लोपीस, सुनिल डिमेलो, विल्सन मच्याडो, पायस मच्याडो यांचा समावेश आहे. ब्रिजिदना कुटिन्हो मुख्य कार्यकारी अधिकारी तर अग्नेलो पेन मुख्य व्यवस्थापक आहेत. माहिती तंत्रज्ञान व उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक सेवा देणे, त्यांची उन्नती साधणे, कायम पारदर्शी कारभार करणे, आघाडीची बँक होणे, सभासदांना आधुनिक व पायाभूत सुविधा देणे, बँकेचा गोवा व दीव-दमण येथे शाखाविस्तार करणे, रिटेल बँकेवर भर आदी उद्दीष्टे बँकेने ठेवली आहेत.

Web Title:  Basin Catholic Bank celebrating the centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक