महाराष्ट्र बँकेचे मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 04:55 PM2020-11-19T16:55:25+5:302020-11-19T16:55:49+5:30

नांदूरशिंगोटे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या दापूर शाखेमार्फत सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील सोनेवाडी येथील 36 लाभार्थ्यांना मत्स्यपालनासाठी कर्ज मंजुरी पत्र देण्यात आली.

Bank of Maharashtra Promotion of Fisheries | महाराष्ट्र बँकेचे मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन

सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी येथील आदिवासी लाभार्थ्यांना मत्स्यपालनासाठी कर्ज मंजुरीचे पत्र देताना मत्स्यविभागाच्या अधिकारी विजयालक्ष्मी. समवेत महाराष्ट्र बँकेचे अधिकारी वर्ग.

Next
ठळक मुद्दे सोनेवाडीत 36 लाभार्थ्यांना कर्ज प्रकरणे

नांदूरशिंगोटे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या दापूर शाखेमार्फत सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील सोनेवाडी येथील 36 लाभार्थ्यांना
मत्स्यपालनासाठी कर्ज मंजुरी पत्र देण्यात आली.
महाप्रबंधक आणि विभागीय व्यवस्थापक एन. एस. देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास शाखा व्यवस्थापक
अमरदीप आढाव, संदीप माळी, पंकज भोसले, अभिजीत गायकवाड, प्रियंका सावंत, सरपंच कैलास सहाणे, मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी विनोद लवारे, विजयालक्ष्मीचे अधिकारी केरू पाटील, मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गावंडे, सचिव अहिलाजी वारे, बबन जगताप, गोरख थेटे आदींसह लाभार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र बँकेची दापूर ही पहिली शाखा असून त्यांनी मत्स्यव्यवसाय योजना अंतर्गत
कर्जाचे वितरण करण्यास पुढाकार घेतला असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी लवारे यांनी स्पष्ट केले. महाव्यवस्थापक देशपांडे यांनी बँकेकडे प्रमाणित ट्रॅक रेकॉर्ड ठेवलेल्या कर्जदार यांचा सत्कार केला. त्यांनी लाभार्थ्यांना कर्जाचे महत्व व त्याचा उपयोग करण्याबाबत माहिती
दिली. आदिवासी समुदायाला बँकिंग शिकण्यास आणि सराव करण्यासाठी खात्यात व्यवहार वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले. विशेष म्हणजे गरजू मच्छीमारांना शासकीय योजना देण्यास पुढाकार घेतला असल्याचे
त्यांनी सांगितले.


 

Web Title: Bank of Maharashtra Promotion of Fisheries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.