पोलीस परवानगीशिवाय होर्डिंग, पोस्टर लावण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 01:25 AM2021-09-18T01:25:40+5:302021-09-18T01:27:09+5:30

महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २२ मध्ये होणार असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांच्या परवानगीशिवाय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक लावण्यावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी बंदी घातली आहे. त्यांनी यासंदर्भात शुक्रवारी अधिसूचना जारी केली असून, पोलीस आयुक्तांचा आदेश क्रमांक नमूद नसलेले फलक - होर्डिंग बेकायदेशीर समजण्यात यावे व ते तात्काळ नष्ट करण्यात यावेत, असे आदेश या अधिसूचनेद्वारे दिले आहेत.

Ban on hoardings and posters without police permission | पोलीस परवानगीशिवाय होर्डिंग, पोस्टर लावण्यास बंदी

पोलीस परवानगीशिवाय होर्डिंग, पोस्टर लावण्यास बंदी

googlenewsNext
ठळक मुद्देअधिसूचना : अनधिकृत फलक हटविण्याची जबाबदारी महापालिकेवर

नाशिक : महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २२ मध्ये होणार असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांच्या परवानगीशिवाय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक लावण्यावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी बंदी घातली आहे. त्यांनी यासंदर्भात शुक्रवारी अधिसूचना जारी केली असून, पोलीस आयुक्तांचा आदेश क्रमांक नमूद नसलेले फलक - होर्डिंग बेकायदेशीर समजण्यात यावे व ते तात्काळ नष्ट करण्यात यावेत, असे आदेश या अधिसूचनेद्वारे दिले आहेत. तसेच अशा प्रकारची परवानगी नसलेले अनधिकृत होर्डिंग हटविण्याची जबाबदारी महापालिकेवर असल्याचे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेश क्रमांकाशिवाय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक लावणाऱ्या व्यक्तींवर तसेच त्यावर नाव असलेल्या व्यक्ती किंवा संघटनांवर तसेच अशा संघटनेचे संचालक, सचिव, अध्यक्ष आदी व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. फलक नष्ट करण्यासंबंधीची कार्यवाही नाशिक महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर किंवा आयुक्तांच्या अधिपत्याखालील निर्देशित अधिकाऱ्यांनी करण्याविषयीच्या सूचना या माध्यमातून करण्यात आल्या असून, फौजदारी प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांना करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.

इन्फो-

मजकूर प्रमाणित करून घेणे बंधनकारक

नगर विकास विभागाच्या दि. १ जून २००३च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका हे शासकीय व खासगी जागेत जाहिरात फलकांना परवा देण्यासाठी सक्षम आहे, मात्र सार्वजनिक सुव्यवस्था सभ्यता व नीती अनुषंगाने प्रत्येक जाहिरात फलकांवरील मजकूर (तयार करणे किंवा प्रदर्शन करणे किंवा प्रसार करण्यापूर्वी) पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्याकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक राहील. यासाठी महानगरपालिका यांनी प्रत्येक जाहिरात फलकावरील मजकूर पोलीस आयुक्त यांच्याकडे प्रमाणित करण्यासाठी पाठवावे व पोलीस आयुक्त यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच जाहिरात फलकाला परवानगी द्यावी, असेही या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

इन्फो-

जागेविषयीही द्यावी लागणार माहिती

पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फ्लेक्स, फलक इत्यादींची परवानगी नाशिक महानगरपालिका यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच ज्या व्यक्ती किंवा संघटन यांनी संबंधित जाहिरात फलक तयार, प्रदर्शन किंवा प्रसार करण्याची जबाबदारी मिळाली असेल असे मुद्रक व प्रकाशक यांनी जाहिरात फलकामध्ये सर्व परवानगी क्रमांक व मुदत तसेच अर्जदाराचे नाव इत्यादी नमूद करून पोलीस आयुक्त यांच्याकडून प्रमाणित करून घेण्याच्या सूचनाही यात करण्यात आल्या आहेत. हे फलक महानगरपालिका प्राधिकृत कुठल्या ठिकाणी लावणार आहे याची माहिती देणे संबंधित व्यक्ती किंवा संघटन यांना बंधनकारक असेल. महानगरपालिका प्राधिकृत ठिकाणाशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फ्लेक्स, फलक इत्यादी लावण्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे.

Web Title: Ban on hoardings and posters without police permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.