निर्यातबंदीने बळीराजा संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:35 AM2020-09-16T01:35:50+5:302020-09-16T01:36:33+5:30

केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे सांगितले. तर कृषीमंत्री दादा भुसे यांनीही या निर्यातबंदीस विरोध दर्शविला. खासदारांनीही केंद्र सरकारला निर्णय रद्द करण्यासाठी साकडे घातले आहे.

Baliraja angry over export ban | निर्यातबंदीने बळीराजा संतप्त

कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नामपूर येथे बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यावेळी उपस्थित दीपक पगार, डॉ.दीपपाल गिराशे, विलास सावंत, शशीकांत कोर, हेमंत कोर, मोहित कापडणीस आदी.

Next
ठळक मुद्देकांदा दरात घसरण : जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको; ठिय्या आंदोलन

नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे सांगितले. तर कृषीमंत्री दादा भुसे यांनीही या निर्यातबंदीस विरोध दर्शविला. खासदारांनीही केंद्र सरकारला निर्णय रद्द करण्यासाठी साकडे घातले आहे.
सटाणा येथील कृषी उत्पन्न समितीच्या गेटसमोर शेतकºयांनी निर्यातबंदी उठवावी याबाबत घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. लासलगाव येथे संतप्त कांदा उत्पादकांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. विक्रीसाठी कांदा घेऊन आलेल्या वाहनातील लिलाव सुरू झाल्यानंतर सुरुवातीला पहिला कांदा लिलाव १९०० रुपये बाजारभावाने विक्री झाल्याने संतप्त कांदा उत्पादकांनी पाच मिनिटांत लिलावप्रक्रिया बंद
पाडली. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली दिसून आली.
नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीत सकाळी केवळ तीन ट्रॅक्टर कांद्याचा लिलाव झाला. क्विंटलचे दर १,२८० ते २२०० रूपयांपर्यंत घसरल्याने शेतकºयांनी लिलाव बंद पाडले. त्यानंतर लिलाव झाले नाही. पिंपळगाव बाजार समितीत २१ हजार क्विंटल आवक झाली. सरासरी भाव २,३१५ जास्तीत जास्त २,९००, तर कमीतकमी १५०० जाहीर झाला. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पिंपळगाव बाजार समितीत १,०९० रूपयांची घसरण झाली. त्यामुळे दुपारी शेतकºयांनी
कांदा लिलाव बंद पाडले. अधिकाºयांच्या मध्यस्थीने बाजारभाव ३,४०० रुपये पुकारण्यात आले. त्यानंतर लिलाव झाले. सरासरी भाव २,९०० रुपये जाहीर झाला होता.

Web Title: Baliraja angry over export ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.