आवारी गुरु जी : आदीवासींचा मित्र अन् संस्कृती संशोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:27 PM2019-07-05T12:27:13+5:302019-07-05T12:30:18+5:30

नाशिकच्याच नव्हे तर एकूण आदिवासी क्षेत्रात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, अशा मुळ नाशिककर असलेल्या गंगाराम जानू आवारी यांच्या जन्मशताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने...

Awari Guru ji: Adivasi's friend and culture researcher | आवारी गुरु जी : आदीवासींचा मित्र अन् संस्कृती संशोधक

आवारी गुरु जी : आदीवासींचा मित्र अन् संस्कृती संशोधक

googlenewsNext
ठळक मुद्देपशु पक्ष्यांची भाषा अवगत असणारा अवलीयाआदिवासींची संस्कृती टिकवण्यात मोलाचा वाटावनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून सेवा कार्य

चराचरात परमेश्वर आहे असे मानणारी आपली भारतीय संस्कृती... पशु- पक्षी, प्राणी कीटक, वनस्पती, वृक्ष- वेली अशा सर्व घटकांनी ही सृष्टी समृद्ध बनलीआहे...असं म्हणतात की, इथल्या प्रत्येक जीवाला आपली स्वत:ची एक भाषा आहे. मग तो पशू असो प्राणी असो वा अगदी वनस्पती देखील...! एकरु प होऊन जर त्यांच्याशी संवाद साधला तर ते देखील आपल्याशी संवाद करू शकतात. या पशुपाांची... वनस्पतींची भाषा अवगत असणारा व अगदी सहजपणे त्यांच्याशी संवाद साधणारा एक विलक्षण व्यक्ती नाशिक जिल्ह्यात जन्माला आला.
गंगाराम जानू आवारी हे त्या महापुरु षांचे नाव...

वनवासी कल्याण आश्रमाचे माजी प्रांताध्यक्ष व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै. आवारी गुरु जी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. गुरु जींचा जन्म ५ जुलै १९१९ साली नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यात असलेल्या बोरवट या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पेठ मध्येच झाले. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली.१९४२ च्या दुष्काळात त्यांनी खूप मोठे सामाजिक कार्य केले. आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. त्याच काळात त्यांनी पूजनीय ठक्करबाप्पा यांच्या प्रेरणेने डांग सेवा मंडळ या सेवाभावी संस्थेचे कार्य सुरू केले. मंडळाचे ते आजीव सदस्य होते. १९४२ ते १९४७ हा काळ स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात ब्रिटीश सरकारबद्दल असंतोष व असहकाराचे आंदोलन सुरू होते. त्यातही पेठ तालुक्यात आघाडीवर राहून गुरु जींनी आंदोलनाची धुरा वाहिली.

आवारी गुरु जी जनजाती समाजाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी सतत चिंतन करणारे अभ्यासक व संशोधक होते. वनवासी समाजाच्या थोर परंपरा, इतिहास,लोकगीते देवदेवता जनजातींची अंगभूत वैशिष्ट्ये, पूजापद्धती, परंपरागत औषधोपचार, पशुपक्षांच्या सवयी, विविध बोली भाषेतील पाच हजार शब्दांचा कोष असे विविध विषय त्यांनी अभ्यासले. त्यातील काही ग्रंथरुपाने देखील प्रकाशित करण्यात आलेले आहेत. वनौषधी उपचार पद्धतीबद्दलचा अभ्यास हा गुरु जींच्या जीवनाचा ध्यास होता. ६५० वनौषधींची सखोल माहिती गुरु जींकडे उपलब्ध होती. नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघाच्या सहकार्याने त्यांचे औषधी
रानावनातली हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते.कोईमतूर च्या लोकस्वास्थ्य परंपरा संवर्धन समतिी तसेच कर्जत तालुक्यातील कशेळीच्या आयुर्वेद संशोधन संस्थेचे गुरु जी सल्लागार होते. आदिवासींचे परंपरागत उपचार , आदिवासी लोकगीते ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. श्री आवारी गुरु जी यांच्या शब्दकोशातील २० टक्के शब्द मराठीत आलेले नाहीत. त्यांचा १२२ पक्षांचा त्यांच्या अंड्याचा, त्यांचा आकार, रंग ,प्रकार याबाबत गाढा अभ्यास होता. पिसांचा औषधासाठी कसा उपयोग करता येईल याचाही अभ्यास त्यांनी केलेला होता. माशांचे अनेक प्रकार देखील त्यांनी अभ्यासले, कीटकांच्या नोंदी केल्या, सर्पाच्या विविध जाती, वन्य प्राण्यांच्या नोंदी त्यांनी केलेल्या आहेत.

गुरु जी अनेक वर्षे वनवासी कल्याण आश्रमाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. १९९७ साली पेठ तालुक्यातील कायरेसादर पाडा येथे परकीय शक्तींच्या विरोधात एक मोठा संघर्ष उभा राहिला होता. आवारी गुरु जींची या सगळ्या संघर्षात खूप मोठी भूमिका होती. आदिवासी हे हिंदूच असून त्यांच्या संस्कृतीला.... अस्तित्वाला धोका निर्माण होईल अशाप्रकारे कुठलेही आक्र मण सहन केले जाणार नाही, अशी भूमिका गुरु जींनी घेतली होती. त्यातूनच पुढे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र प्रांतात हिंदुत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला प्रचंड मोठे जनसमर्थन लाभले. या सगळ्या संमेलनांमध्ये आदिवासी हे हिंदूच आहेत अशा प्रकारची स्पष्ट भूमिका आवारी गुरु जींनी त्या काळात मांडली होती.

१२ जानेवारी २००० ला तत्कालीन महाराष्ट्र शासनाने एक अजब फतवा काढला होता. जनजाती विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू शब्दाचा उल्लेख केला जाऊ नये अशा प्रकारचा तो आदेश होता. शासनाच्या या अजब फतव्यामुळे आवारी गुरु जी प्रचंड संतप्त झाले होते. सरकार आमच्या अस्तित्वावरच घाला घालत आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. एवढ्यावरच गुरु जी थांबले नाहीत तर त्यांनी थेट शासनाला जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर धडक दिली. गुरु जींचा प्रभाव एवढा होता की त्यांच्या प्रभावा पुढे झुकून शासनाने तो वादग्रस्त अध्यादेश मागे घेतला.

गुरु जींनी जनजाती समाजाच्या विकासासाठी आपले संपूर्ण वू आयुष्य खर्ची घातले. अखेरपर्यंत त्यांनी जनजाती समाजाचे प्रबोधन केले व त्यांच्या आयुष्याला विकासाची दिशा दिली त्यांचा हाच वारसा आपण
पुढे चालवू या.


- महेश काळे, प्रचार प्रमुख, पश्चिम क्षेत्र, वनवासी कल्याण आश्रम.

Web Title: Awari Guru ji: Adivasi's friend and culture researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.