सिन्नरला कोविड योद्धयांची जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 06:30 PM2020-07-12T18:30:28+5:302020-07-12T18:30:48+5:30

सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून तालुक्यात तब्बल २३१ रु ग्णसंख्या झाल्याने नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली.

Awareness rally of Kovid warriors at Sinnar | सिन्नरला कोविड योद्धयांची जनजागृती रॅली

सिन्नरला कोविड योद्धयांची जनजागृती रॅली

Next

विभागीय प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, सिन्नर नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. निर्मला गायकवाड, डॉ. लहू पाटील रॅलीच्या अग्रभागी होते. पीपीई किट परिधान केलेले दोन कोरोना योध्दे, रु ग्णवाहिका आण िपोलीस वाहन यांचा रॅलीत समावेश होता. यावेळी घरीच राहा, सुरक्षित राहा, एकजूटीचे दाखवू बळ, कोरोना काढेल पळ, कोरोना हारेल, देश जिंकेल, आया है कोरोना, इससे मत डरना, पोलिसांना सहकार्य करा, पोलीस आहेत मित्र, कोरोनाशी लढू एकत्र, गो कोरोना गो, अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली. सिन्नर नगर परिषद येथील हुतात्मा चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला. कुंभार भट्टी, गंगावेस, चांडक चौक, लाल चौक, नाशिक वेस, खासदार पुल, भैरवनाथ मंदिर, नवीन पुल, लोकनेते वाजे विद्यालय, बसस्थानक, नेहरू चौक, गणेश पेठ, छत्रपती शिवाजी चौक, तानाजी चौक, कालभैरवनाथ मंदिर, वावी वेस, पिंपरी नाका मार्गे रॅली हुतात्मा चौक येथे राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. यावेळी आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, ताहीर शेख, दीपक पगारे, राकेश शिंदे, विष्णू हाडके, विजय वाजे, भीमराव संसारे, भूषण नवाल, कट्यारे, सौरभ गायकवाड, प्रवीण भोळे, घोरपडे आदींसह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Awareness rally of Kovid warriors at Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.