खर्डे परिसरात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 01:27 PM2020-03-30T13:27:00+5:302020-03-30T13:27:00+5:30

खर्डे : कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील अति दुर्गम अशा खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या वाजगाव , खर्डे , कनकापुर ,शेरी , वार्शी आदी गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

 Awareness in the Khardi area | खर्डे परिसरात जनजागृती

खर्डे परिसरात जनजागृती

Next

खर्डे : कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील अति दुर्गम अशा खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या वाजगाव , खर्डे , कनकापुर ,शेरी , वार्शी आदी गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे, तसेच नायब तहसीलदार बनसोडे, ग्रामविस्तारअधिकारी जयंत भामरे , समन्वयक अमति आहेर आदी उपस्थित होते . या पथकाने गावांत जात कोरोना आजाराबाबत जनजागृती केली. यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीला निर्जंतुकीकरण संदर्भात तसेच स्वच्छ पाणी पुरावा , अत्यावश्यक असलेल्या दुकानात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून सोशल डिस्टनन्स बाबत सूचना करण्यात येऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले . अंगदुखी, सर्दी, ताप, घसा दुखणे अशी लक्षणे असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तातडीने सल्ला घेण्याबाबत सांगण्यात आले. किराणा दुकान, भाजीपाला बाजार यांची एक मीटरची मार्किंग करण्यात आल्या. प्रत्येक गावात ग्रामसेवक, आरोग्यसेवक, तलाठी व पोलिसपाटील यांनी संयोजन केले.

Web Title:  Awareness in the Khardi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक