कळवण नगरपंचायतकडून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 04:20 PM2019-09-23T16:20:08+5:302019-09-23T16:20:19+5:30

कळवण - येथील नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत स्वच्छता हिच सेवा मोहीम राबविण्यात आली. यात प्लॉस्टिक मुक्त कळवण करीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Awareness about plastics ban by Kalwan Nagar Panchayat | कळवण नगरपंचायतकडून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

कळवण नगरपंचायतकडून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

Next

कळवण - येथील नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत स्वच्छता हिच सेवा मोहीम राबविण्यात आली. यात प्लॉस्टिक मुक्त कळवण करीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतून स्वच्छ शहर , सुंदर शहर व प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली . रॅलीचा शुभारंभ कळवण नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयापासून होऊन, गांधी चौक, राजवाडा, बसस्थानक, मेनरोड, डॉ न्याती चौक, शाहीर लेन, सावरकर चौक, सोनार गल्ली मार्गे नेण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील आर के एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जानकाई माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या रॅलीत नगराध्यक्ष मयूर बहिरम, उपनगराध्यक्ष कौतिक पगार, मुख्याधिकारी सचिन माने, नगरसेविका अनिता जैन, नगरसेवक बाळासाहेब जाधव, प्रशासकीय अधिकारी दिपक बंगाळ, पाणी पुरवठा अभियंता उमेश राठोड, सिटीकॉर्डीनेटर प्रियांका धात्रक, अमोल आहेर, योगेश पगार, संजय आहेर, राजेंद्र अमृतकार, लक्ष्मण पगार, नकुल सूर्यवंशी, धनराज परदेशी, विशाल पगार, लीना वाघीरे, संजय आहेर, स्वप्निल पगार, वसंत जाधव, दत्तात्रेय जाधव, विनोद केदारे , रमेश पगार व नागरपंचायतीचे सफाई कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------
सध्या पावसाळा सुरु असल्याने स्वच्छतेबाबत नागरिकांनी नगर पंचायतीला सहकार्य करावे रस्त्यावर अथवा व इतरत्र कचरा टाकून घाणीचे साम्राज्य होणार नाही याची काळजी घ्यावी. ओला व सुका कचरा डस्बीन मध्ये साठवून घंटा गाडीत टाकावे, आपल्या सोबत शहरवासियांचे आरोग्य सांभाळावे.
-मयूर बहिरम, नगराध्यक्ष
--------------------------
कळवण शहरातील ज्या व्यापारी प्रतिष्ठानात प्लास्टिक पिशवी विक्र ी अथवा वापर आढळून आल्यास त्यांच्यावर कायद्यातील तरतुदी प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल .
-सचिन माने, मुख्याधिकारी , कळवण

Web Title: Awareness about plastics ban by Kalwan Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक