चुलत मामाकडून भाचीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:14 PM2020-06-29T23:14:30+5:302020-06-29T23:14:51+5:30

नाशिक : चुलत बहिणीच्या १३ वर्षीय मुलीला मोबाइल दाखविण्याच्या आमिषाने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मामाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Atrocities on niece by cousin | चुलत मामाकडून भाचीवर अत्याचार

चुलत मामाकडून भाचीवर अत्याचार

Next
ठळक मुद्देउपचारादरम्यान डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे निदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चुलत बहिणीच्या १३ वर्षीय मुलीला मोबाइल दाखविण्याच्या आमिषाने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मामाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला पालकांनी दवाखान्यात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे निदान केले व सोनोग्राफी चाचणीअंति तिला गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे. म्हसरूळ गावाजवळ संशयित कुणाल जाधव (२१, रा. लोणघाट, जि. बुलढाणा) याने अल्पवयीन पीडित मुलीला ४ मार्चला मोबाइलचे आमिष दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. भीतीपोटी पीडित मुलीने तिच्या आईवडिलांना काहीही सांगितले नाही; मात्र तिला त्रास होऊ लागल्याने या गंभीर गुन्ह्याला वाचा फुटली. याबाबत संशयित चुलत मामा कुणाल जाधव याच्या विरूद्ध म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास महिला उपनिरीक्षक जाधव या करीत आहेत.

Web Title: Atrocities on niece by cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.