सुरगाण्यात सशस्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:21 AM2019-10-18T01:21:30+5:302019-10-18T01:21:59+5:30

कळवण - सुरगाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून आलेल्या सीआरपीएफच्या जवानांसह पोलिसांनी शहरातून संचलन केले.

Armed movement in the tunnel | सुरगाण्यात सशस्र संचलन

सुरगाणा शहरातून सशस्र संचलन करताना पोलीस व सीआरपीएफचे जवान.

Next

सुरगाणा : कळवण - सुरगाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून आलेल्या सीआरपीएफच्या जवानांसह पोलिसांनी शहरातून संचलन केले. विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यात संवेदनशील मतदान केंद्रांसह सर्व मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीला गुजरातमधून सीआरपीएफचे जवान दाखल झाले आहेत. तसेच पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात येऊन आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. उपनिरीक्षक युवराज सैंदाणे, एस. ए. नांद्रे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Armed movement in the tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.