घनकचरा व्यवस्थापन शुल्क प्रस्तावाला मंजुरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 03:09 PM2020-08-27T15:09:21+5:302020-08-27T15:12:00+5:30

इगतपुरी : शहरातील घरोघरचा कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे पगार गेल्या तीन चार महिन्यांपासून झालेच नसल्याने कामगारांनी कामबंद ठेवल्याने शहरात घाणीची शक्यता नाकारता येत नाही. या कामगारांचा पगार देण्यासाठी ठेकेदारास त्वरित बिल अदा करण्यात यावे. या मागणीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले.

Approve the solid waste management fee proposal | घनकचरा व्यवस्थापन शुल्क प्रस्तावाला मंजुरी द्या

घनकचरा व्यवस्थापन शुल्क प्रस्तावाला मंजुरी द्या

Next
ठळक मुद्देइगतपुरी : उपनगराध्यक्षांचे तहसीलदार यांना निवेदन

लोकमत न्युज नेटवर्क
इगतपुरी : शहरातील घरोघरचा कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे पगार गेल्या तीन चार महिन्यांपासून झालेच नसल्याने कामगारांनी कामबंद ठेवल्याने शहरात घाणीची शक्यता नाकारता येत नाही. या कामगारांचा पगार देण्यासाठी ठेकेदारास त्वरित बिल अदा करण्यात यावे. या मागणीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले.

नगर परिषद हहीत १४ व्या वीत्त आयोग योजनेच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत ही मंजुरी अप्राप्त असुन या कामाची मंजुरी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. मात्र अज्ञात मंजुरी प्रस्ताव कार्यालयीन प्राप्त झालेला नाही. नगर परिषदेकडे निधी नाही या प्रस्तावाबाबत अशाने त्वरित निर्णय घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी निवेदन देतांना उपनगराध्यक्ष नवीन उपनगराध्यक्ष नईम खान, नगरसेवक युवराज भोंडवे, उमेश कस्तुरे, दिनेश कोळेकर आदी उपस्थित होते.

nagar
प्रशासनाच्या निर्देशानुसार जे सफाई कर्मचारी कार्यरत आहे ती संख्या कमी असून, घनकचरा व्यवस्थापन कंत्राटी पद्धतीने आहे. या खर्चाची तरतूद जिल्हाधिकारी प्रशासनाच्या प्रस्ताव मंजुरीने केली जाते. याकरीता प्रशासकीय मंजुरीचा पाठपुरावा सुरू आहे.
- निर्मला गायकवाड, मुख्याधिकारी.

शहरातील घनकचरा साचून आरोग्याच्या समस्या वाढल्याच्या तक्र ारी नागरिकांकडून होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
- संजय इंदुलकर, नगराध्यक्ष

संकलन करणाºया घंटागाड्या नगर परिषदेच्या मालकीच्या असून आरोग्य विभाग व अस्थापना सूचीवर आकृतीबंधानुसार कोणत्याही प्रकारे चालकपद मंजूर नाही. तसेच, सफाई कर्मचाºयांची संख्या कमी असून प्रशासनाने कंत्राटी पद्धतचा अवलंब केल्याने याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो.
- नईम खान, उपनगराध्यक्ष.

Web Title: Approve the solid waste management fee proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.