रेशनवरील धान्य खरेदीचा व्हायरल झालेला तो अर्ज बनावट...  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 07:14 PM2020-03-30T19:14:37+5:302020-03-30T19:14:45+5:30

अन्न नागरी विभागाचा खुलासा

application for rationing grain purchase went viral is fake | रेशनवरील धान्य खरेदीचा व्हायरल झालेला तो अर्ज बनावट...  

रेशनवरील धान्य खरेदीचा व्हायरल झालेला तो अर्ज बनावट...  

Next

 नाशिक :   रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडियावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म व्हायरल केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नाही, त्यामुळे  नागरिकांनी आपली संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म  उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे.  सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीच्या पोस्ट पव्हायरल करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: application for rationing grain purchase went viral is fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.