ग्रामस्वच्छता पुरस्कारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:20 AM2020-01-24T00:20:50+5:302020-01-24T00:55:35+5:30

ग्रामीण भागात कार्यरत ग्रामपंचायतींनी स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने केलेल्या कामांचे मूल्यमापन करणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता विभागीय पुरस्कारांची घोषणा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गुरुवारी केली असून, त्यात नाशिक जिल्ह्णातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Announcement of Village Sanitation Award | ग्रामस्वच्छता पुरस्कारांची घोषणा

ग्रामस्वच्छता पुरस्कारांची घोषणा

Next

नाशिक : ग्रामीण भागात कार्यरत ग्रामपंचायतींनी स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने केलेल्या कामांचे मूल्यमापन करणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता विभागीय पुरस्कारांची घोषणा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गुरुवारी केली असून, त्यात नाशिक जिल्ह्णातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींनी ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी, महिला सक्षमीकरण आदी कामे करणे या अभियानात अपेक्षित धरण्यात आले आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकाविला असून, द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्णातील नवापूर तालुक्यातील कडवान लहान ग्रामपंचायत व जळगाव जिल्ह्णातील मुक्ताईनगर येथील चिंचोल ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. तिसरा क्रमांक देखील विभागून देण्यात आला असून, त्यात चांदवड तालुक्यातील शिरसाणे व नगर जिल्ह्णातील संगमनेर तालुक्यातील साकूर या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Web Title: Announcement of Village Sanitation Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.