जाहीर प्रचाराची आज होणार सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 02:08 AM2019-10-19T02:08:43+5:302019-10-19T02:10:09+5:30

कॉँग्रेसवगळता अन्य सर्वपक्षीय वरिष्ठ राष्टÑीय आणि राजकीय नेते गुरुवारपर्यंत आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिक महानगरात येऊन गेले. शनिवारी (दि.१९) सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. अखेरच्या दिवशी मोठ्या नेत्यांच्या सभांचे कोणतेही नियोजन नाही. शेवटच्या दिवशी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी प्रत्येक उमेदवाराकडून झाली आहे.

Announcement of publicity will happen today | जाहीर प्रचाराची आज होणार सांगता

जाहीर प्रचाराची आज होणार सांगता

googlenewsNext
ठळक मुद्देनेत्यांच्या सभा नाहीच : अंतिम टप्प्यात उमेदवारांचा रॅलींवर भर

नाशिक : कॉँग्रेसवगळता अन्य सर्वपक्षीय वरिष्ठ राष्टÑीय आणि राजकीय नेते गुरुवारपर्यंत आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिक महानगरात येऊन गेले. शनिवारी (दि.१९) सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. अखेरच्या दिवशी मोठ्या नेत्यांच्या सभांचे कोणतेही नियोजन नाही. शेवटच्या दिवशी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी प्रत्येक उमेदवाराकडून झाली आहे.
अत्यल्प कालावधीत सर्व लहानसहान भागात फिरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवाराने केला. ऊन असतानाही शहरभर अनेक उमेदवारांच्या रॅलीत तुफान गर्दी होती. राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह छोटे-मोठे पक्ष व अपक्षांनीही रॅली काढली. गर्दी दाखवून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण महानगरात शुक्रवारी हेच चित्र होते. उमेदवारांनी शक्यतो प्रभागातील रस्ते पिंजून काढले. आतापर्यंतच्या प्रचारातून सुटलेल्या सर्व वस्त्यांना व भागांना उमेदवारांनी भेटी दिल्या. दरम्यान, शनिवारी जाहीर प्रचाराची सांगता होणार असल्याने राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये आणि उमेदवारांच्या प्रचार केंद्रात शुक्रवार सायंकाळपासून तयारी सुरू झाली. मतदारराजापर्यंत उमेदवाराची स्वच्छ छबी कशी पोहोचवता येईल याबाबतचे नियोजन सुरू होते.
निवडणूक पथकेही सज्ज
आता छुपा प्रचार करून मतदारांपर्यंत कसे पोहचता येईल, त्यासाठी काय करावे लागेल याच्या तयारीत प्रमुख पदाधिकारी आणि उमेदवार व्यस्त असल्याचे चित्र आहेत. दरम्यान जाहीर प्रचार संपल्यानंतर संभाव्य गैरप्रकारांना रोखण्यासाठी निवडणूक पथकेही सज्ज असून, त्याची प्रत्येक मतदारसंघात करडी नजर असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे मतदानाच्या आदल्या रात्री होणाऱ्या कथीत गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे़

Web Title: Announcement of publicity will happen today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.