ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊनही हिरवा चाऱ्याची कमतरता
वणी : दिंडोरी तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊनही हिरवा चारा उपलब्ध न झाल्याने चारा टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पशुपालन व्यवसाय प्रतिकुल परिस्थितीत सापडला आहे.
दिंडोरी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला तालुक्यातील सर्व धरणे भरली शेती व्यवसायास दिलासा मिळाला. मात्र उशिरा आलेल्या पावसाने पशुपालन व्यवसायाचे गणित बदलून टाकले आहे. कारण उशिरा आलेल्या पावसामुळे जनावरांना खाण्यायोग्य हिरवा चारा जमिनीत उगण्यास अजुन एक महिन्याचा कालावधी असल्याने पर्यायी महागडा चारा व खाद्य खरेदी करावे लागत आहे.
सध्या हिरव्या बांड्या पाच रु पये प्रतीकिलोने विकत घ्यावा लागतो आहे. सुक्या गवताच्या गाठी प्रतिकीलोसाठी ४५ रु पये, सरकी ढेप ३५ रु पये किलो, कांडी नावाचे खाद्य २८ रु पये प्रतिकिलो, भाताचा कोंडा १६ रु पये तर जनावरांसाठीचे पीठ १७ रु पये किलो तसेच गव्हाचा भुसा २० रु पये कीलो दराने खरेदी करावा लागत असल्याची माहीती दुध उत्पादक जाधव यांनी दिली.
सध्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने दुधविक्र ी व्यवसाय हा पांढरा हत्ती पोसण्यासारखे असुन नाईलाजाने जनावरांचा उदरनिर्वाह चालविणे म्हणजे घर घालुन धंदा असल्याची माहीती त्यांनी दिली.
प्रतिवर्षी जनावरांच्या खाद्याचे दर नियंत्रणात असायचे मात्र उशिरा आलेल्या पावसामुळे गणित बदलले असुन चारा टंचाईचा सामना करावा लागत असल्याची माहीती अंबानेर येथील दुध उत्पादक हिरामन चौरे यांनी दिली.
(फोटो १९ चारा)
Web Title: Animal Husbandry Businesses Due to Fodder Scarcity
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.