‘स्मार्ट’वर भुजबळ नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:38 PM2020-01-18T23:38:27+5:302020-01-19T01:01:07+5:30

महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत केवळ सुशोभिकरण न करता लोकांच्या गरजा आणि सुरक्षितता ओळखून खर्च करणे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचेदेखील प्रश्न असताना कामे पुढे रेटली जाता कामा नये, तर लोकांच्या गरजा ओळखून कामांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्तांना केल्या.

Angry at 'Smart' | ‘स्मार्ट’वर भुजबळ नाराज

‘स्मार्ट’वर भुजबळ नाराज

Next
ठळक मुद्देकंपनीचा कारभार। लोकांच्या गरजा ओळखून कामे करण्याच्या आयुक्तांना सूचना

नाशिक : शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत केवळ सुशोभिकरण न करता लोकांच्या गरजा आणि सुरक्षितता ओळखून खर्च करणे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचेदेखील प्रश्न असताना कामे पुढे रेटली जाता कामा नये, तर लोकांच्या गरजा ओळखून कामांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्तांना केल्या.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन आराखडा बैठकीत मनपा आयुक्तांनी महापालिकेचा आराखडा सादर करताना स्मार्ट सिटीच्या कामाकडे लक्ष वेधले. स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भातील अनेक तक्रारी आहेत. एक किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी दोन वर्षे लागल्याचा मुद्दा आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित करून शहरातील वाहतुकीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. यावेळी आयुक्त गमे यांनी राष्टÑीय महामार्गाचा हा विषय असल्याचे सांगताच पालकमंत्र्यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासंदर्भात काय करता येईल याला प्राधान्य देण्याच्या सूचना केली. स्मार्ट सिटी ग्रीनफिल्ड येथील शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप निकाली निघालेले नाहीत. त्यांच्या गरजा ओळखल्या पाहिजेत. या कामातील पहिल्या टप्प्यात पूररेषेत होणाºया कामांच्या फेर नियोजनाबाबतही भुजबळ यांनी सूचना करताना लोकांच्या हितासाठी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. स्मार्ट सिटीत नागरिक असुरिक्षत असता काम नये. सुरक्षा देण्याचे काम पोलिसांचे आहे. स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी तरतूद केली जावी. सीसीटीव्हीमुळे शहरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मदत होईल, असेदेखील पालकमंत्र्यांनी सुचविले.

द्वारका चौकाच्या वाहतूक कोंडीचा मुद्दा
स्मार्ट शहराचा विषय मांडला जात असताना आमदार माणिकराव कोकाटे आणि आमदार राहुल अहेर यांनी द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याची तरतूद करण्याची मागणी केली. रस्ते रुंदीकरणाची गरज लक्षात घेऊन स्मार्ट सिटीचे काम हाती घेणे अपेक्षित होते, असे कोकाटे यावेळी म्हणाले. शहरातील द्वारका आणि इंदिरानगर बोगदा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही, तर द्वारका चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कोकाटे यांनी दिला.

पालकमंत्र्यांची सूचना
द्वारका येथील वाहतूक कोंडीचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाल्यानंतर भुजबळ यांनी मुंबईतील हाजीअलीचे उदाहरण दिले. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असताना तेथील वाहतूक बेट तोडून तेथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. तसा काही प्रयत्न करता येईल का याचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या.

कॅमेºयांचे नियोजन करावे-पोलीस आयुक्त
शहराच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून ५२६ कॅमेरे लावण्यात आले आहे. आणखी ४,५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अनधिकृत रिक्षा आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे. त्यासाठीचे नियोजन करण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Angry at 'Smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.