Anger over citizens of Sahakarnagar area missing name from voter list | मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप

मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप

ठळक मुद्देमतदार यादीत नावाची शोधाशोधनाव गहाळ झाल्याने नागरिकांमध्ये संताप

नाशिक : शहरातील नाशिक पूर्व मतदारसंघातील सहकारनगर परिसरात अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत या सर्वांनी मतदान केले असतानाही या विधानसभा निवडणुकीत मतदान करता न आल्याने या मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
सहकारनगर भागातील अनेक मतदारांची आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर येऊन निराशा झाली. मतदार यादीत नावच नसल्याने अनेक नागरिकांना मतदान करता आले नाही. या भागातील काही कुटुंबांची नावे मतदार यादीतून गहाळ असल्याचे दिसून आले. अशा प्रकरणांमध्ये विविध पक्षांच्या बूथवरील कार्यकर्त्यांनी मोबाइल अ‍ॅप आणि लॅपटॉपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नाव शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही मतदारांना दिलासा मिळाला असला तरी अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागल्याने अशा मतदारांंनी संताप व्यक्त केला आहे. 
कोट- 
सकाळपासून सर्व बूथवरील मतदार याद्या पाहून झाल्या. शिवाय मोबाइल अ‍ॅपसोबतच निवडणूक आयोगाच्या संके तस्थळावरही नाव शोधले. मात्र मतदार यादीत नाव न मिळाल्याने मतदान करता आले नाही. लोकसभा निवडणुकीत याच भागात नाव होते. असे असताना मतदार यादीतून नाव कसे गहाळ होऊ शकते. 
- विशाल बाफणा, नागरिक 

Web Title: Anger over citizens of Sahakarnagar area missing name from voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.