आमडोंगरा पाड्याची भागली तहान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:29 PM2020-04-05T23:29:52+5:302020-04-05T23:31:04+5:30

पेठ : कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी चालू असतानाच दुसरीकडे पेठ तालुक्यातील आमडोंगरा गावावर दुहेरी संकट ओढवले असून, ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या समस्येवर स्थानिक जलमित्रांच्या सतर्कतेने तात्पुरती तहान भागली आहे.

Amadong paddy's thirsty! | आमडोंगरा पाड्याची भागली तहान !

पेठ तालुक्यातील आमडोंगरा येथे दुरुस्तीनंतर हातपंपाला आलेले पाणी.

Next
ठळक मुद्देहातपंप दुरु स्ती : जलमित्रांचा पुढाकार

पेठ : कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी चालू असतानाच दुसरीकडे पेठ तालुक्यातील आमडोंगरा गावावर दुहेरी संकट ओढवले असून, ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या समस्येवर स्थानिक जलमित्रांच्या सतर्कतेने तात्पुरती तहान भागली आहे.
कोरोनामुळे घराबाहेर पडू नये, असा आदेश असताना पेठ तालुक्यातील आमडोंगरा येथील विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब जलपरिषद मित्र परिवाराच्या लक्षात आली. तात्काळ दखल घेत ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच पंढरीनाथ महाले यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्याने सरपंचांनी गावातील काही वर्षांपासून नादुरु स्त हातपंप दुरुस्त करण्यासाठी कारागीर बोलावून दुरुस्त करण्यात आले. हातपंपाला पाणीसाठा कमी असला तरी काही दिवसांसाठी आमडोंगरा ग्रामस्थांची तहान भागली आहे. याप्रसंगी जल परिषद सदस्य शरद पवार, कुमार पवार, सरपंच पंढरीनाथ महाले, मीराबाई महाले, भागवत महाले, मोतीराम महाले, विजय महाले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Amadong paddy's thirsty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.