पंचायत समितीमध्ये रेशनकार्डचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 10:45 PM2020-02-02T22:45:17+5:302020-02-03T00:24:13+5:30

पंचायत समिती सभापतींच्या दालनात रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्र म पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय टळणार असून, अनेकांना रेशनकार्डच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Allocation of ration card in Panchayat Samiti | पंचायत समितीमध्ये रेशनकार्डचे वाटप

येवला पंचायत समितीत लाभार्थींना रेशनकार्ड वाटपप्रसंगी प्रवीण गायकवाड, प्रसाद पाटील, ए़ एस़ शेख आदी़

googlenewsNext

येवला : येथील पंचायत समिती सभापतींच्या दालनात रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्र म पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय टळणार असून, अनेकांना रेशनकार्डच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाचे रेशनकार्ड विभक्त करून त्यांना कुठलेही पुरावे नसल्यामुळे रेशन कार्ड त्यांच्या नावाची मिळण्यासाठी मोठी अडचण होत होती. तहसीलदार व रेशन विभागप्रमुख हावळे यांच्याशी चर्चा करून संबंधित ग्रामीण भागातल्या जनतेला रेशनकार्डपासून वंचित राहणार
नाही, यासाठी सभापती प्रवीण गायकवाड यांनी सभापती दालनात रेशनकार्ड वाटपास सुरु वात केली आहे. याप्रसंगी अंगुलगाव येथील लाभार्थींना रेशनकार्ड वाटण्यात आले. ए. एस. शेख, नगरसूलचे सरपंच प्रसाद पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नाशिक जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, बाळू मोरे, अरुण मोरे, अरविंद पवार आदी उपस्थित होते.
सध्या ग्रामीण भागामध्ये आजोबांच्या नावाचे रेशनकार्ड वापरणारे बहुसंख्य कुटुंब आहेत. हे प्रमाण आदिवासी समाजामध्ये जास्त दिसून येते. त्यामुळे सभापती गायकवाड यांनी ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाला रेशनकार्ड स्वतंत्र करून त्यांना शासकीय योजनेचा लाभ कसा प्राप्त होईल, यासाठी मोहीम चालू केली आहे.

Web Title: Allocation of ration card in Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.